Friday, 3 November 2023

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा !!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा !!

डोंबिवली - मिनल पवार 
डोंबिवली येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी इंदिरा चौकात सांगली उपोषण गुरुवारी करण्यात आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला. रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पाठिंबा बाबतचे पत्र दिले. रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या हस्ते पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किशोर मगरे, जिल्हा सचिव सिध्दार्थ रणपिसे महासचिव रमेश बर्वे, संघटक वसंत टेकाळे, तुकाराम पवार, महिला जिल्हा संघटक अपेक्षा दळवी, रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...