महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचा विनापरवाना सावकारी विरुद्ध एल्गार !!
मुंबईतून शेकडो जणांकडे अधिकृत सावकारी परवाने आहे. मात्र त्याचा वापर योग्य रीतीने होत नसल्याचे महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा सावकाराच्या कामकाजाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे व त्यांच्या वर कठोर कारवाई होण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.
या सोबतच अनधिकृत सावकारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पसरला असून यातूनच घडलेला प्रसंग वांगणी येथील रहिवासी असलेले राजेंद्र नागोटकर (५७) पालिकेच्या सी उत्तर विभागाच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. २०१४ मध्ये मित्राच्या ओळखीने जगदीश भादरका या सावकाराकडून ७ टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतले. ठरल्याप्रमाणे राजेंद्र हे दर महिन्याला ७ हजार रुपये देत होते. ५ वर्षे नियमितपणे पैसे दिलेसुद्धा, मात्र कोरोनामुळे कामावर जात नसल्याने राजेंद्र यांना व्याजाची रक्कम देणे शक्य झाले नाही. त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. असे व इतर अनेक प्रकारचे अत्याचार या सावकारी व्यवसायातून केले जातात.
महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या वतीने अशांवर कठोर कारवाई ची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
No comments:
Post a Comment