कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळ वरप कांबा येथे ऐन दिवाळीत'धुळवड, हवेची गुणवत्ता खाली, श्वसनाचे अनेक आजार, डॉक्टर संपावर?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसह कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळ, वरप कांबा या परिसरात ऐन दिवाळीच्या सणात, धुळवड सुरू झाली आहे, हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खाली आल्याने श्वसनाच्या आजारात वाढ झाली असताना आरोग्य अभियानाचे शेकडो डॉक्टर संपावर गेले आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे'दिवाळे, निघणार आहे.
पाऊस लवकरच थांबल्याने उष्णता वाढत आहे, कल्याण डोंबिवली सह शेजारच्या म्हारळ, वरप, कांबा, या परिसरात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे धुरामुळे व सिंमेट, मातीमिश्रित धुळीचे लोट पसरत आहेत, पावसाळा संपला असला तरी खड्डे, म्हारळ, वरप, कांबा, या रस्त्यावर टाकलेली माती, सिंमेट चे मिश्रण, त्यात वाहनांची वर्दळ यामुळे मोठ्या प्रमाणात दिवसभर धुरळा उडत आहे,संध्याकाळी हवेत गारवा आणि वातावरण कुंद होत असल्याने रस्त्यावरील उडणारी धुळ थरामध्ये जमा होऊन त्याचे पट्टे आजुबाजुला पसरतात, त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा असलेली गृहसंकुले, गावे, घराच्या खिडक्यावर धुळीचे थर जमा होतात.
कल्याण मुरबाड रस्त्यावरील म्हारळ, वरप, कांबा, यासह कल्याण बदलापूर रस्ता, कल्याण शिळ रस्ता, पुना लिंक रस्ता, घरडा सर्कल, एमआयडीसी रोड, टिटवाळा रोड,रेल्वे स्टेशन परिसर इत्यादी ठिकाणी हिच परिस्थिती निर्माण झाली आहे.
याशिवाय कल्याण मुरबाड मार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान गेल्या कित्येक महिन्यापासून सिंमेट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे, ते अद्यापही अर्धवट असल्याने येथे तर अक्षरशः धुळवड दिसून येत आहे, रस्त्यावर व मधे मोठ्या प्रमाणात माती टाकल्याने वाहनांच्या वर्दळीने उडणारी धुळ दुरपर्यत पसरली जाते, यामुळे या परिसरात व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना श्वासोच्छ्वास घेण्या अडचणी येत आहेत, श्वसनाचे अनेक आजार उद्भवू लागले आहेत, दमा,सर्दी, खोकला, ताप,डोळ्याचे विविध आजार, या आजाराने लोक हैराण झाले आहेत.
अशातच आरोग्य अभियानाचे शेकडो डॉक्टर संपावर गेले आहेत, त्यामुळे ग्रामीण रुग्णालय गोवेली, खडवली, मुरबाड, सेंट्रल हाँस्पिटल येथे गर्दी वाढत असून रुग्ण सेवेचा ताण आरोग्य विभागावर पडत आहे. तसं पाहिलं तर कल्याण डोंबिवली परिसरात ही हवेची गुणवत्ता खाली गेली आहे. एक्यूआय इंडेक्सने गुणवत्ता पातळी २०० ओलांडली आहे तर डोंबिवली मध्ये ती २५० वर पोहोचली आहे. हवेतील धुलीकण व इतर घातक घटकांचे प्रमाण वाढले आहे. हे ठरविण्यासाठी पार्टिक्युलेट मँटर हे प्रमाण वापरले जाते. यात पीए १० आणि पीएम २.५ हे दोन घटक असतात, पीएम १० म्हणजे १० मायक्रोमीटर पेक्षा सुक्ष्म कण, आणि पीएम २.५ म्हणजे अडिज मायक्रो मीटर पेक्षा छोटे अतिसूक्ष्म कण याचा समावेश असतो. यामुळे हवेची गुणवत्ता कळून येते. ती कमी झाल्याने या परिसरातील नागरिकांना ऐन दिवाळीत, धुळवडीला' सामारे जावं लागतं आहे. विशेष म्हणजे हे घडते आहे ते शासन सर्वत्र 'माझ्या वसुंधरा अभियान ४.० राबवित असताना? काय योगायोग !
No comments:
Post a Comment