ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकीत पगार राहणीमान भत्ता फरकासाठी 28 नोव्हेंबर रोजी लाक्षणिक संप...
चोपडा (जळगाव), प्रतिनिधी... महाराष्ट्र राज्यातील तसेच जिल्ह्यातील कर्मचारी कोरोना 19 काळापासून बहुतांशी फक्त राज्य शासनाकडील पगाराच्या 50 /75 टक्के अनुदानावरच काम करीत असून त्यांना 2013 पासून देय असलेले राहणीमान भत्ता 90% पंचायतींनी लागू केलेले नाही.. पेसा अंतर्गत ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांचे हाल यांचा विचारच नका. राहणीमान भत्ता लागू करणे. पगाराच्या 50 ते 25 टक्के रक्कम ग्रामपंचायत देणे द्यायला पाहिजे ते देखील देत नाहीत. दुसरीकडे ग्रामसेवकांचे पगार वेळेवर होतात. तसेच ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना लक्ष देत नाहीत पाहिजे. सरळ वसुलीच्या नावाने सबब सांगून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेच्या वेतनाचा हिस्सा देत नाहीत. त्यांची देखील अनुदान वेळेवर होते तेव्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे विनंती आहे की, पंचायतींनी आजवर देय असलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी पगाराचा हिस्सा रकमेचा हिशोब व रक्कम द्यावी. प्रा . फंड रक्कम भरणा करावा ज्यांची खाते खोललेले नाहीत वा बंद पडलेले आहेत त्यांचे खाते खोलावीत त्याचप्रमाणे राहणीमान भत्ता लागू करावा. या मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ जळगाव जिल्हा तर्फे 28 नोव्हेंबर 2023 रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार राहणीमान भत्ता आणि प्रायव्हिजन फंड या प्रश्नाकडे लक्ष न देणाऱ्या पंचायतीतील ग्रामसेवकांचे वेतन व लोकनियुक्त सरपंच पदाधिकारी यांचे मानधन देऊ नये.. त्यांचा अनुदान खर्चाच्या रकमा रोखून धरा ही देखील मागणी या आंदोलनात केली जात आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी 28 नोव्हेंबरला ग्रामपंचायत कामावर एक दिवशीय काम बंद आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे करण्यात येत आहे
कर्मचाऱ्यांनी मागील फरक मिळतोय अशा भूलथापांना बळी न पडता आपली एकजूट मजबूत करावी. असे आवाहन जाहीर पत्रकाद्वारे राज्य युनियनचे सचिव अमृत महाजन, जिल्हाध्यक्ष संतोष खरे, राजेंद्र खरे, रमेश पाटील, अशोक गायकवाड, किशोर कनडारे, संजय कंडारे आदींनी केलेले आहे
No comments:
Post a Comment