Saturday, 18 November 2023

वरप कांबा येथे दिसलेल्या बिबट्या बाबतीत अफवांचे पीक, वनविभागाचे पाच ग्रामपंचायतीना पत्र !

वरप कांबा येथे दिसलेल्या बिबट्या बाबतीत अफवांचे पीक, वनविभागाचे पाच ग्रामपंचायतीना पत्र !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण वनपरिक्षेच्या अखत्यारीतील वरप व कांबा येथील मालकी आणि सरकारी जंगल भागात बिबट्या चा वावर दिसून आला होता, यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या परिसरात सर्च आँपरेशन केले व बिबट्या निघून गेल्याचे सांगितले. परंतु यानंतर मात्र  बिबट्यावरुन कपोलकल्पित कथा, कहाण्या, घटना यांचे पीक आले असून यासाठी वनविभागाने तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना पत्रे पाठवली असून यामध्ये बिबट्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

गेल्या मागील वर्षी कल्याण तालुक्यातील जांभूळ, वसत, पठारपाडा, आणे भिसोळ, नांलिबी आदी भागात बिबट्या आला होता, या भागातील बकरी, कुत्रे गाईचे वासरू, त्यांनी ठार केले होते, शिवाय मुरबाड तालुक्यातील पळू, सोनाळे, सिंगापूर येथे एका आदिवासी महिलेला ठार केले जाते. त्यावेळी या भागात मोठ्या प्रमाणात भिती पसरली होती. यानंतर आता दोनच दिवसापूर्वी कल्याण तालुक्यातील वरप, कांबा ग्रामपंचायत हद्दीतील टाटा पाँवर हाऊस मध्ये बिबट्या घुसल्याचे सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये दिसून आले होते. याने कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी आर एन चन्ने यांनी आपल्या टिम सोबत या परिसरात सर्च आँपरेशन केले. या दरम्यान झाडावर मिळालेल्या नखांच्या ओरखड्यावरुन तो टाटा पाँवर हाऊस मधून निघून गेल्याचे सांगण्यात आले. अशा आशयाच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र यानंतर विविध प्रकारच्या अफवांचे पीक आले, सोशलमिडियावर तर वेगवेगळे जुने पुराने विडिओ टाकण्यात आले, तर काही जण सांगू लागले की जांभूळ, वसत परिसरात बिबट्याला कोंडला आहे, अजून एका बातमीने तर कहरच केला, की एका तरुणाने बिबट्याला पकडून ठेवले आहे, अशा या विविध प्रकारच्या अफवामुळे वनविभाग देखील हैराण झाला आहे.

त्यामुळे शेवटी कल्याण वनविभागाने तालुक्यातील वरप, कांबा, आणेभिसोळ, नांलिबी, जांभूळ, वसत, आदी ५ ग्रामपंचायतींना पत्रे पाठविली आहेत, यामध्ये म्हटलं आहे की, कल्याण वनपरिक्षेत्राच्या अखत्यारित आपले गाव येत असून गावाच्या मालकी व सरकारी जंगल भागात बिबट्या चा वावर आढळून आला आहे, त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष टाळता यावा यासाठी रात्रीचे घराबाहेर पडू नये, गटाने काठी बँटरी घेऊन फिरावे, रात्री कुत्रे जोरजोराने भुंकत असल्यास जवळपास बिबट्या आहे असे समजावे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या व गाय म्हैस, इ पाळीव प्राणी बंद गोठ्यात ठेवावेत, गावातील कच-याचे नियोजन करावे, गावात स्वच्छता ठेवावी, मोकाट कुत्रे, डुकरे व इतर भटक्या जनावरांच्या संख्येत वाढ होणार नाही याची काळजी घ्यावी, उघड्यावर शौचास जावू नये, वाड्या वस्त्यांवर पथदिवे लावावे. जनावरांना एकटे सोडू नये, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अफवांवर विश्वास ठेऊ नये व अफवा पसरु नये, आदी मुद्यांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांनी संयम बाळगावा व ग्रामपंचायतीने जनजागृती करावी असे वनविभागाने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...