साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबईतर्फे लिटिल एंजल अनाथ आश्रम मढ मालाड येथे ६० अनाथ मुलांना नवीन कपडे, खाऊ वाटप !!
मुंबई, (शांताराम गुडेकर/मोहन कदम) :
साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई यांच्या सहकार्याने दर वर्षीप्रमाणे यंदाही दिपावली निमित्त लिटिल एंजल अनाथ आश्रम मढ मालाड येथे ६० अनाथ मुलांना नवीन कपड्याचे वाटप व खाऊ देण्यात आला.
या कार्यासाठी सर्वस्वी योगदान श्री.शेखर वरवडेकर व सौ.शमा शेखर वरवडेकर या उभयतांचे होते. या कार्यक्रमामध्ये श्री.मंगेश अंकुश रासम, सौ. मनीषा मंगेश रासम, श्री.अनिल रामनाथ वडके, श्री.हरीश गोविंद गवळी, श्री.विनायक बळीराम सावंत, श्री.अंकुश मंगेश रासम, श्री. प्रवीण गोविंद इंगावले यांचे ही सहकार्य लाभले. साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे विभागात कौतुक होत असून यानिमित्ताने अनेकांनी त्यांना अभिनंदन सह शुभेछा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment