आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी कल्याण पूर्वच्या विकासासंदर्भात घेतली आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांची भेट !!
*मुख्यमंत्री व खासदारांवर अप्रत्यक्ष टीका*
तसेच काही लोक बोलतात की, आमदार गायकवाड यांनी काय विकास केला. त्यांच्या नेत्यांनी आमच्या समोर येऊन बोलले पाहिजे. त्यांच्या नेत्यांनी, महापौरांनी या जागा विकसीत केल्या असत्या तर, आज कल्याण पूर्वेतील विकासाचे वेगळे चित्र असते. या आरक्षित जागेवर बेकायदा बाधकामे झालेली आहे. त्या जागा ताब्यात घेतलेल्या नाहीत. या सर्व अडचणी आहे. दादासाहेब गायकवाड मैदानातील गॅलरी तयार करण्यात आली होती. त्याचे टेंडर ज्या कंपनीला दिले होते. त्याने अर्धवट काम केले आहे. त्याला कामाचे पैसे पूर्ण दिले आहेत. अशा अनेक गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली.
आमदार गणपत गायकवाड यांनी आज विकासकामावरून पुन्हा अप्रत्यक्ष रित्या शिवसेना शिंदे गटाला लक्ष केलं. भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले आहेत की, "सत्तेत जे हिस्सेदारीत बसले आहे. त्यांना कल्याण पूर्वचा विकास करायचा नाही. माझा १२९ कोटीचा निधी कोणी थांबविला, हे तुम्हाला माहिती आहे. विविध खात्यातून येणारा प्रत्येक निधी आडविला जातो. कुणी कितीही अडविले तरी विकास होणारच.'' असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता लक्ष्य केले आहे.
No comments:
Post a Comment