शहाड मोहोने टिटवाळा विभागात राज्य सरकारचा आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही !!
*जिजाऊ संस्था शिधावाटप अधिकाऱ्याला घेराव घालणार*
कल्याण, संदीप शेंडगे : शहाड मोहने परिसरात राज्य सरकारने घोषित केलेला आनंदाचा शिरा पोहोचलाच नसल्याने गोरगरिबांची दिवाळी गोड होण्याऐवजी पांचट होण्याची चिन्हे दिसत आहे.
यावर्षी नागरिकांना दिवाळीपूर्वीच आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिधावाटप अधिकाऱ्यांना आदेश दिले असले तरी अद्याप आनंदाचा शिधा रेशनिंग वर पोहोचलाच नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी घरात गोड गोड तयार व्हावे याकरिता राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता परंतु हा आनंदाचा शिधा अद्याप पर्यंत हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचलाच नसल्याने गोरगरिबांनी दिवाळी साजरी कधी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आनंदाचा शिरा यामध्ये रेशनिंग धारकांना अल्प दरात शंभर रुपयात चनादाल, साखर, मैदा, पामतेल, पोहा, रवा, उपलब्ध करून दिला आहे परंतु या वस्तू अद्याप पर्यंत रेशनिंग दुकानात पोहोचल्याच नसल्याने गोरगरिबांनी दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न जिजाऊ संस्थेचे कल्याण पश्चिम समन्वय संदीप शेंडगे यांनी केला आहे.
आनंदाचा शिधा नागरिकांना तात्काळ वाटप करावे दिवाळी साजरी करण्यापासून कोणीही वंचित राहू नये या उद्देशाने जिजाऊ संस्थेचे कल्याण पश्चिम समन्वय संदीप शेंडगे हे शिधावाटप अधिकारी कल्याण यांना जाब विचारणार असून तात्काळ आनंदाचा शिधा वाटप करावा अन्यथा शिधावाटप कार्यालयाला टाळे ठोकण्याचा शेंडगे यांनी इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment