Monday, 13 November 2023

कल्याण तालुक्यात अवकाळी पावसामुळे पंचवीस हेक्टर भात शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांची दिवाळी कडू ?

कल्याण तालुक्यात अवकाळी पावसामुळे पंचवीस हेक्टर भात शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांची दिवाळी कडू ?

कल्याण, (संजय कांबळे) : ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या अवकाळी पावसामुळे कल्याण तालुक्यातील सुमारे २५ हेक्टर भात शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला असून शेतकऱ्यांनी टोल फ्री नंबर वर तक्रार दाखल करावी असे अवाहन कल्याण तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांनी केले आहे.

कल्याण तालुक्यात सुमारे ४ हजार ५४५ शेतभात पिकांखाली असून यावर्षी पाऊस चांगला पडल्याने भाताची लागवड देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. पिक चांगले आल्याने दसरा झाल्यावर भात कापणी करायची असे नियोजन तालुक्यातील शेतक-यांनी केले होते. त्यानुसार काही गावात घरघुती तर काही ठिकाणी मजुर घेऊन भात कापणी सुरू झाली, भात थोडेफार ओले असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी ते शेताच्या बांधावर व शेतात सुकण्यासाठी पसरले होते, अशातच दिवाळी आल्याने सणानंतर भात भारे बांधून घरी आणू असा विचार शेतकरी करत असतानाच दोनच दिवसापूर्वी कल्याण तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडला. कापलेले भातपीक वाचविण्याची संधी न मिळाल्याने ते शेतातच भिजले व कुजले, रायते पिंपळोली, दहागाव,चौरे, आपटी, मांजर्ली, बापसई, आदी अनेक गावांत अशीच परिस्थिती होती.

कल्याण तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, व पिक विमा कंपनीचे कर्मचारी वर्ग गावोगावी फिरून झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत, आतापर्यंत सुमारे २५ हेक्टर भात शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे, तालुक्यातील ८०/९० टक्के शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असल्याचे सांगून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी १८००२३३७४१४ या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषी अधिकारी कुमार जाधव यांनी केले आहे. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी मात्र कडू झाली आहे एवढे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...