बलिप्रतिपदा पाडव्या निमित्त रायते येथे भव्य रांगोळी व किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन !
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण तालुक्यातील रायते येथे बळीप्रतिपदा पाडव्या निमित्त पारंपरिक खेळांचे आयोजन रायते ग्रामस्थांन कडुन करण्यात आले होते.पहाटे बळी पुजन करून आपली गुरु-ढोर,जनावराना रंग -रंगोटी करून सुरेख पणे सजवले होते, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओव्हाळी या युक्ती नुसार गावाच्या वेशी वरून गुरांची मिरवणूक काढण्यात आली यात बालगोपाल, तरुण वर्ग, जेष्ठ नागरिक महिला मोट्या उत्सात सहभागी झाल्या होत्या, गावातील महिला व बालगोपाल, यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पारंपरिक खेळानांचे महत्व अबादित ठेवण्यासाठी पुर्ण गाव एक संघ राहण्यासाठी भव्य रांगोळी व किल्ले बांधणी व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात जवळ जवळ ५२ स्पर्धेकांनी सहभाग घेतला असुन रांगोळी साठी प्रथम क्रमांकांची मानकरी सानिका लक्ष्मण मुठोलकर द्वितीय क्रमांक जागृती नारायण सुरोशी तृतीय क्रमांक कविता संदीप तारमले व किल्ले बांधणी व सजावट मध्ये प्रथम क्रमांक भावेश बाळाराम सुरोशी व ग्रुप द्वितीय क्रमांक के.जी.स्पोर्ट्स छोटे उत्साद तृतीय क्रमांक अथर्व अविनाश सुरोशी व ग्रुप यांना देण्यात आले. यासाठी निरीक्षक म्हणुन, रमेश सुरोशी सर, रामचंद्र गोडांबे सर सुभाष सुरोशी सर, भालचंद्र सुरोशी काम पाहिले.
या कार्यक्रमासाठी *विशेष सहयोग राम सुरोशी,पत्रकार नारायण सुरोशी, विशाल घावट श्रीकांत तारमले, किशोर पवार, अमोल सुरोशी अनंता सुरोशी* सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती
*सरपंच करिष्मा सुरोशी उपसरपंच मयुर सुरोशी, नरेशजी सुरोशी ग्रामपंचायत सदस्य हरेशजी पवार, वैशाली पवार, विजय सुरोशी,भगवान पवार,ओमकार सुरोशी ,दिनेश राऊत, संजय सोनवले,बालाजी सुरोशी*, महिला वर्ग,बालगोपाल तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment