Tuesday, 14 November 2023

रुळावरून चालत घराकडे परतणाऱ्या महिलेवर बलात्कार, टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील धक्कादायक घटना !

रुळावरून चालत घराकडे परतणाऱ्या महिलेवर बलात्कार, टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील धक्कादायक घटना !

कल्याण, (संजय कांबळे) : टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ धक्कादायक घटना समोर आलीय. महिला प्रवासी लोकलने उतरून आपल्या घरी जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत असलेल्या रुळा शेजारील  झुडपात हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी नराधम निशांत चव्हाण याला अटक केली आहे . या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा रेल्वे स्थानकात आली. पीडित महिला शहाड येथे एका खाजगी कंपनीत काम करते. टिटवाळा रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ही पीडित महिला शेजारीच असलेल्या रुळावर चालून आपल्या घराकडे जात होती. एक इसम तीचा पाठलाग करत होता  पीडित महिला फोनवर आपल्या पतीशी बोलत होती, आजुबाजुला कोणी नाही याचा फायदा घेऊन पाठलाग करणाऱ्या इसमाने तिला जबरदस्तीने खेचून रुळालगत असलेल्या झाडाझुडपात नेले तिच्यावर बलात्कार केला. याच दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता. या इसमाने घटनेची कुठे वाच्यता केली तर जिवे ठार मारू अशी धमकी या नराधमाने दिली. घरी परतल्यानंतर घाबरलेल्या महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला पतीने त्या परिसरातील काही नागरिकांना फोनवर संपर्क साधला. तत्काळ आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत या नराधमाला पळून जाण्याच्या आत पकडलं व पोलिसांच्या स्वाधीन केलं . निशांत चव्हाण असे या नराधमाचं नाव असून त्याच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत हा पडघा येथे एका खाजगी कंपनीत काम करतो. याप्रकरणी एसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान या घटनेमुळे रात्री अपरात्री काम करून घरी परतणाऱ्या महिलामध्ये कमालीची भिती पसरली असून महिलांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...