Wednesday, 15 November 2023

ग्रामविकास सामाजिक संस्था पडघा यांच्याकडुन हरिपाडा आदिवासी वस्तीत दिवाळी फराळाचे वाटप !!


ग्रामविकास सामाजिक संस्था पडघा यांच्याकडुन हरिपाडा आदिवासी वस्तीत दिवाळी फराळाचे वाटप !! 


पडला, प्रतिनिधी : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना. तिकडे पडघा येथील हरीचा पाडा (देळे पाडा) ह्या आदिवासी पाड्यावर मात्र दिवाळीचा काहीही उत्साह दिसून येत नव्हता. ग्रामविकास सामाजिक संस्था पडघा यांच्याकडून शहरातील नागरिकांना दिवाळी फराळ देण्याचे आवाहन करण्यात आले. याला पडघा शहरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. १२ व १३ नोव्हेंबर रोजी ग्रामविकास सामाजिक संस्थेने दिवाळी फराळ जमा केला त्यावेळी  148 फराळाचे पॅकेट जमा झाले.  


सदर जमा झालेले 148 फराळाचे पैकेट एकत्र करून हरीचा पाडा (देळे पाडा) येथील आदिवासी वस्तीत १४ तारखेला सायंकाळी ग्रामविकास सामाजिक संस्थेतर्फे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस सब इन्स्पेक्टर संजय कदम, तुकाराम गोंधळी, एएसआय काळुराम काळडोके, पो.कॉ. मुजम्मिल सय्यद पोलीस, ग्रामविकास सामाजिक संस्थेचे एन ए कदम, सुनील पाटील, अश्यपाक शेख, जयेश जाधव, मनोज गुंजाळ, संतोष तेलवणे,उमेश झरेकर, जगदीश गायकवाड, यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामविकास सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व स्थानिक कार्यकर्ते दिलीप पाटील, कलिता खागेन, सुभाष कथोरे. राजु गुप्ता, सौ. वैशाली पाटील, अजय सुतार दिक्षा चव्हाण यांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...