Wednesday, 15 November 2023

कांबा वरप येथील टाटा पाँवर हाऊस मध्ये बिबट्या घुसला, नागरिकांची घाबरगुंडी तर वनविभागाची तारांबळ ?

कांबा वरप येथील टाटा पाँवर हाऊस मध्ये बिबट्या घुसला, नागरिकांची घाबरगुंडी तर वनविभागाची तारांबळ ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड महामार्ग वर आणि कांबा वरप व वरप ग्रामपंचायत शेजारी असलेल्या टाटा पावर हाऊस मध्ये मध्यरात्री बिबट्या घुसल्याने येथे राहणाऱ्या आणि परिसरातील नागरिकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली तर घटनास्थळी धाव घेऊन वनविभागाने सर्च आँपरेशन केले असता बिबट्या निघून गेला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.यामुळे वनविभागाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
कांबा ग्रामपंचायत हद्दीत व वरप ग्रामपंचायत शेजारी टाटा पावर हाऊस कंपनी आहे, येथे रहिवासी देखील वास्तव्य आहे, रात्री एक ते दिडच्या सुमारास शेजारच्या ब्रिसर्ली कंपनीच्या झाडावरून बिबट्या टाटा पावर हाऊस मध्ये उतरला, येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये त्याचा वावर स्पष्ट दिसत असून पोलिस पाटील सचिन भोईर यांनी याबाबतची माहिती कल्याण रेंज आँफिसर रघुनाथ चन्ने यांना दिली, त्यांनी कल्याण वनपाल राजू शिंदे, अभिमन्यू जाधव, पोलीस पाटील सचिन भोईर, आणे भिसोळ सरपंच चंद्रकांत मोहफे वनपाल खडवली, वनरक्षक स्टाफ, वाँर  संस्थेचे सदस्य, व टाटा पाँवर कंपनीचे सुरक्षा रक्षक, यांच्या समवेत  टाटा पावर हाऊस मधील कोपरा न कोपरा शोधला व सर्च आँफरेशन केले, परंतु तो सापडला नाही, झाडावरील बिबट्याच्या नखांच्या ओरबडे व ठशावरुन तो बाहेर निघून गेला आहे असा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. पहाटे ५/६ वाजेपर्यत ही शोध सुरू होती, यामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे तर लोकानी मानव वन्य जीव संघर्ष टाळावा या दृष्टीने बिबट्या वन्यप्राण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

दरम्यान जांभूळ, अंबरनाथ, नालिंबी, रायते, कांबा, पठारपाडा आदी परिसरात बिबट्या चा वावर असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन कल्याण रेंज आँफिसर रघुनाथ चन्ने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...