Thursday, 2 November 2023

वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेवर खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण !!

वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेवर खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण !!


ठाणे , सचिन बुटाला : ठाणे वागळे इस्टेट लुईसवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ घर लुईसवाडी, वागळे इस्टेट, ठाणे येथे असून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे तिथे कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या घराकडे जाणारा सर्विस रोड बंद करण्यासाठी वाहतूक शाखेने अधिसूचना काढली.

त्यामुळे प्रसिद्ध माध्यम, सोशल मीडियावर मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांना ट्रोल करण्यात आले. त्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले, मी किंवा आमच्या कुटुंबायानी ह्या संदर्भात कोणतीही विनंती किंवा सूचना केली नव्हती, तसेच अशा प्रकारची अधिसूचना काढण्यापूर्वी आम्हाला कल्पना दिली नव्हती. आमचे येणे- जाणे सुकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही. 

पोलिस आयुक्तांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्र लिहून “पोलिसांच्या या पत्रकबाजीमुळे आमच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागलाय याची कल्पना पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचीत नसावी. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नसताना परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणारे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्यावर आपण तातडीने कठोर कारवाई करावी. तसेच, यापुढे अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढले जाणार नाही याबाबतची समज संबंधित अधिकाऱ्यांना आपण द्यावी” अशी मागणी केली आहे.


No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...