Thursday, 2 November 2023

भगवान बाळू म्हात्रे यांचे दुःखद निधन !!

भगवान बाळू म्हात्रे यांचे दुःखद निधन !!

ठाणे, (शांताराम गुडेकर) :

          नांदिवली पंचानंद येथील रहिवाशी भगवान बाळू म्हात्रे यांचे दिनांक ३० ऑक्टोबर  २०२३ रोजी  वयाच्या ८९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी दुपारी नांदिवली येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुमन, मुलगा भास्कर, विश्वनाथ, सदानंद, मुलगी उषा मधुकर भोईर ,सरस्वती वासुदेव भोईर ,जनता विजय पाटील, अनिता (जाई) अरविंद भोईर, गीता प्रभाकर पाटील, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी खिडकाळेश्वर मंदिर, कल्याण-शीळ रोड डोंबिवली पूर्व येते आयोजित करण्यात आला असून उत्तरकार्य (तेरावा विधी) मल्हार कृपा नांदिवली येतील राहत्या घरी करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून कळविण्यात आले.आहे. उत्तरकार्यनिमित्त दिनांक ११ नोव्हेंबर  रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. श्री. गुरुवर्य अशोक महाराज गायकवाड यांच्या सुश्राव्य कीर्तनरुपी सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...