शिवसेनेतर्फे मंगळवारी यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे 'सुरेल दिवाळी पहाट' चे आयोजन !
*प्रसिद्ध कलाकार व गायक यांची उपस्थिती*
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण पश्चिम वासियांची दिवाळी यंदा अधिक 'संस्मरणीय' होणार आहे. कल्याणकरांची दिवाळी पहाट सुमधुर गायकीने व्हावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने येत्या मंगळवारी (दि. १४ नोव्हेंबर २०२३) रोजी 'सुरेल दिवाळी पहाट'चे आयोजन केले आहे.
सदर कार्यक्रमात उदय नेने (सुप्रसिद्ध कलाकार), मेघा महिंद्रकर (लावण्यवती अभिनेत्री), चेतन लोखंडे (झी युवा फेम), विश्वजा जाधव (सुपरस्टार सिंगर सोनी टिव्ही फेम), अक्षता सावंत (सिंगर, ॲक्टर, ॲंकर कॉमेडी एक्सप्रेस फेम), मदन शुक्ला (प्लेबॅक सिंगर) हे उपस्थित राहणार आहेत.
सदर 'सुरेल दिवाळी पहाट' चे आयोजन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख, आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. १४/११/२०२३) रोजी यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राऊंड), कर्णिक रोड, कल्याण (पश्चिम), येथे रवी पाटील (शहर प्रमुख, कल्याण पश्चिम), शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, शिवसैनिक, युवासेना यांनी केले आहे.
यावेळी शिवसेनेतर्फे आयोजित 'सुरेल दिवाळी पहाट' मध्ये प्रसिद्ध कलाकार व गायक यांच्या उपस्थितीत कल्याणकार वासियांना व रसिकांना मिळणार अविस्मरणीय स्वरानुभूतीचा अनुभव असे शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment