महिला सक्षमीकरण व बचत गट __
स्वप्न बघणेच नाही तर त्याची स्वप्नपूर्ती करण्याची स्वतंत्रता आपल्याला आपल्या देशात उपलब्ध आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात भारताची सध्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. परंतु जर राज्यातील दारिद्र्यरेषेखालील आकडे वेगाने कमी करायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीने काही ना काही तरी काम धंदे सुरू करून आपली आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे व ते संपूर्ण आपल्याच हातात असते. कित्येक वेळा आपण लोकांना बोलताना ऐकतो की कामधंदा मिळत नाही. परंतु प्रबळ इच्छाशक्ती असेल तर नक्कीच आपण स्वतः ती संधी उपलब्ध करून घेतली पाहिजे. ही जबाबदारी महिलांची सुद्धा आहे, ज्या महिला नोकरी करतात त्यांच्याबद्दल आपल्याला कौतुक आहे. परंतु बऱ्याच महिला घरात असतात घरातील कामे संपवून बराच वेळ असतो व त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट असते. एकटा नवरा कामाला जात असतो व त्याच्या पगारात घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते किंवा घर भाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च व नेहमीच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणारा खर्च, इत्यादी भागवतांना मेटाकुटीला येतात.
महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वारंवार नाना योजना अमलात आणत आहे. प्रत्येक महिला व पुरुष आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे बचत व गुंतवणूक याचे पुरेपूर ज्ञान असणे. घरगुती महिलांसाठी बचत गट हा उत्तम पर्याय असून, या बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी योग्य (प्रकल्प प्रस्ताव) मांडल्यास बँका उत्तम कर्ज उपलब्ध करून देतात व बचत गटांच्या माध्यमातून वस्ती वस्तीतून लघुउद्योग निर्मितीस येऊन दारिद्र्य रेषेखालील लोक आर्थिक सक्षम होऊ शकतील.
समान विचारांच्या होतकरू कमीत कमी दहा किंवा जास्तीत जास्त वीस महिला एकत्र येऊन, कच्चामाल उपलब्ध करून त्यापासून पक्क्या मालाची निर्मिती करून या पक्क्या मालास जेथे मागणी आहे तेथे पुरवठा करून योग्य प्रमाणात जर नफा मिळवला, तर याच लघु उद्योगातून एखादी स्मॉल स्केल इंडस्ट्री उभी राहू शकते व याच महिला इतरही हातांना काम देऊ शकतील.
बलाढ्य लोकसंख्या असूनही चीन ,"वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन", मध्ये सामील कसा होऊ शकतो ? तर याचे उत्तर असे आहे की, चीन व जपान सारख्या देशांतील प्रत्येक घरामध्ये काही ना काही तरी उद्योग करणारी जनता आहे. आपल्या सरकारने तरुण पिढी व्यापार व्यवसायाकडे वळावी म्हणून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया सारख्या योजनां ची निर्मिती केली. तसेच मुद्रा लोन सुरू केले.
अशाच प्रकारे बचत गटांना लघुउद्योग करण्यासाठी बँका कर्ज उपलब्ध करून देतात. आपल्याला काय घेता येते याकडे आपण लक्ष देऊन आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला तर सरकारच्या या प्रयत्नांना यश येऊ शकेल. देशातील जनतेच्या गरजा असलेल्या छोट्या मोठ्या वस्तूंची पूर्तता होऊन मालाची आयात करावी लागणार नाही .तर ,आपला भारत देश वस्तूंची निर्यात करेल व अशा प्रकारे हातांना काम धंदा नसलेल्या जनतेची, राज्यांची, पर्यायाने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही .
.
शब्दांकन - पुष्पा प्रसाद रत्नपारखी
भाजप जिल्हा संयोजिका (बचत गट)
संपर्क - +91 88791 21705
मॅडम तुमचं काम असच चालू ठेवा आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteमॅडम तुम्ही कुठल्याही काम मन लावून करता म्हणून यशापर्यंत पोचतात आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून
ReplyDelete