Monday, 6 November 2023

भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधीत गुटखा विक्री करणाऱ्या गणेश जनरल स्टोर्सवर धाड, साडे ५ लाखांचा गुटखा जप्त !!

भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधीत गुटखा विक्री करणाऱ्या गणेश जनरल स्टोर्सवर धाड, साडे ५ लाखांचा गुटखा जप्त !!

भिवंडी, दिं,६,अरुण पाटील (कोपर) :
        राज्य सरकारने तंबाखूजन्य पदार्थ तसेच विविध गुटख्यावर प्रतिबंध लावला असताना देखील राज्यासह भिवंडी तालुक्यातील विविध ठिकाणी गुजरात राज्यातून आलेला प्रतिबंधित गुटखा खुले आम विक्री केला जात आहे.अश्याच प्रकारे भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्णागाव जे के पेट्रोल पंपा जवळ गेट नं २, स्थित असलेल्या गणेश जनरल स्टोर्स या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धाड मारून दुकानातून ५ लाख ४४ हजार ८२ रुपये किंमतीचा विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.
        अश्याच प्रकारे नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे असंख्य दुकानात व पान टपऱ्यांवर बिनधास्त पणे प्रतिबंधित गुटखा विक्री केला जात आहे.त्यां पैकी काल्हेर गाव बस स्टॉप जवळ असलेल्या अंबिका जनरल सटोर्स या दुकानात देखील प्रतीबंधित गुटखा मोठ्या प्रमाणावर विक्री केला जात आहे.या दुकानाचा चौधरी नामक मालक हा कंटे नरच्या कंटेनर गुटखा मागऊन संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात वितरित करत आहे. तसेच भिवंडी शहरात छोटा अब्दुल्ला व बडा अब्दुल्ला हे तर गुटखा व्यापाऱ्याचे किंग आहेत. ते आपले कंटेनर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातली खारबाव गाव व सोनाळे गाव परीसरात उतरवत आसतात.
         सदर गणेश जनरल स्टार्स मध्ये प्रतिबंधित गुटखा अस साठवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळली असता अधिकारी मेघना पवार, अ.रा.वानरे, इ. ना. चीलवंते व सहाय्यक आयुक्त (अन्न) सं. न. सिसोसिया यांनी धाड मारून वरील किंमती मुद्देमाल जप्त करून दुकान मालक दिनेश गणेशराम चौधरी यास ताब्यात घेऊन स्थानिक  नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...