'सागरा प्राण तळमळला' हे नाटकाचे रविवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात मोफत आयोजन !!
कल्याण , सचिन बुटाला : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी स्वतःच्या सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढयातील आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने कल्याण पश्चिम चे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर व शहरप्रमुख रवी पाटील यांच्या संकल्पनेतून 'सागरा प्राण तळमळला' हे नाटक रविवारी (दि. ०५ नोव्हेंबर २०२३) कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात संध्याकाळी ७.३० वाजता मोफत सादर करण्यात येणार आहे.
आताच्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन प्रवासाची महती कळावी, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात हे नाटक आयोजित केले आहे.
यावेळी शहरप्रमुख रवी पाटील यांनी सांगितले 'स्वातंत्र्यवीर सावरकरां'चे देशभक्तीचे विचार घराघरांत पोहचविण्यात येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना-भाजप युतीतर्फे 'हर घर सावरकर' अभियान राबवले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचे योगदान आहे. त्यांचे विचार युवा पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी अभियान सुरू झाले असून, त्यास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सावरकरांच्या आयुष्यावर हे नाटक असून, त्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात सादर केले जात आहेत. हा नाट्यप्रयोग विनामूल्य आहे. प्रवेशिका शिवसेना शहर शाखा, बिर्ला कॉलेज, कल्याण पश्चिम येथे उपलब्ध आहेत.'
No comments:
Post a Comment