Friday, 3 November 2023

सार्वजनिक ग्रंथालयांना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन !!

सार्वजनिक ग्रंथालयांना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन !!   

ठाणे,  प्रतिनिधी :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या सन 2023-2024 साठी समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

      समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत. तसेच असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा स्थापन’ करण्याकरिता अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

       इच्छुकांनी प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पाठवावेत. तसेच अधिक माहितीसाठी आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...