मुंबई महानगर पालिकेत आरोग्य खात्यातील ठेकेदार तुपाशी व रोजंदारी बहुउद्देशीय आरोग्य सेवक कामगार उपाशी !!
*उठा उठा दिवाळी आली रोजंदारी बहुद्देशीय कामगारांना बोनस देण्याची वेळ झाली*
****क्राईम सुत्रला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील के ई एम, सायन, नायर, क्षय रोग शिवडी रुग्णालयातील कर्मचारी दिवाळी सानुग्रह अनुदान ( बोनस ) प्रकरणी आंदोलनाच्या पवित्र्यात
मुंबई, विकास जगताप -
मुंबई महानगर पालिकेतील आरोग्य खात्यात के ई एम, सायन, नायर, क्षय रोग शिवडी, रुग्णालयात गेले 15 वर्ष 400 ते 500 रोजंदारी बहुउद्देशीय कामगार आरोग्य सेवक तुटपुंज्या वेतनावर कोणत्याही सुखसुविधा नसतानाही प्रामाणिक पने आपले काम करीत आहे, जागतिक महामारी कोवीडच्या काळात याच कामगारांनी स्वतःच्या व स्वतःच्या कुटुंबाच्या जीवाची बाजी लावून काम केले, या कामगारांना गणवेश, PF, ESIC, CL, EL सह दिवाळी बोनस मिळावा या करीता हे रोजंदारी कामगार गेले अनेक वर्ष पाठपुरावा करीत आहेत,
दर वर्षी मुंबई महानगर पालिकेतील सर्व ठेकेदारी कंत्राटी व मलेरिया कीटक नाशक खात्यातील सर्व रोजंदारी कामगारांना दिवाळी बोनस देण्यात येतो, परंतु आरोग्य खात्यातील रोजंदारी बहुउद्देशीय कामगार हे गेले 14 वर्ष झाले 49.58 लेव्ही व बोनस पासून वंचित आहे,
मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात क्षयरोग नियंत्रण संस्थेत कर्मचारी कार्यरत आहेत, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, वरिष्ठ डॉटस् प्लस टी.बी., एच. आय. व्ही., पर्यवेक्षक, आरोग्य प्रचारक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संगणकचालक, लेखापाल आदी विविध पदांवर काम करत आहेत. क्षयरोगाचे संशयीत रुग्ण शोधणे, त्यांची तपासणी करणे, क्षयरोग असलेल्यांना उपचार सुरू करणे, उपचार खंडीत रुग्णांचा पाठपुरावा करुन त्यांना पुन्हा औषधोपचार सुरू करणे आदी कामे या कर्मचारी, अधिकाऱ्यांना करावी लागते आहे; मात्र मागील अनेक वर्षापासून या कामगारांना सानुग्रह अनुदान दिले जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया क्राईम सूत्रशी बोलताना कामगारांनी दिली.
मुंबई महानगर पालिकेच्या मा.आयुक्तांनी या रोजंदारी बहुउद्देशीय कामगारांवर होणारा अन्याय दूर करून त्यांना न्याय मिळवून द्यावा व दिवाळी तोंडावर आली असून सर्व महानगर पालिकेने कामगारांचा बोनस जाहीर केला असून नवी मुंबई महानगर पालिकेने कायम कामगारांना 30000 तर किमान वेतनावर काम करीत असलेले रोजंदारी कामगारांना 24000 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर केला असून मुंबई महानगर पालिकेतील सर्व प्रमुख रुग्णालयातील रोजंदारी बहुउद्देशीय कामगारांना मुंबई महानगर पालिकेने 24000 हजार रुपये बोनस लवकरात लवकर जाहीर करावा अशी मागणी के ई एम ,सायन ,नायर ,क्षय रोग शिवडी रुग्णालयातील रोजंदारी कामगार कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे, अन्यथा आझाद मैदानात आमरण उपोषण करू तसेच के ई एम सायन, नायर क्षय रोग, शिवडी रुग्णालयात भीक मागू असा इशारा मुंबई महानगर पालिकेतील के ई एम, सायन, नायर, क्षय रोग शिवडी रुग्णालयातील रोजंदारी बहुद्देशीय कामगार कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment