Saturday, 4 November 2023

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली स्थानिक स्वयंघोषित कार्यकर्त्यांकडून जनतेची लूट !!

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली स्थानिक स्वयंघोषित कार्यकर्त्यांकडून जनतेची लूट !!

*SRA नोंदणी नाही, जनतेकडून कागदपत्रांची मागणी.*

मुंबई दि (प्रतिनिधी) : येथील स्थानिकांकडून झोपडीवासियांचे सरकारी दस्त मागवले जातं असून प्रकल्प अद्याप एसआरए मध्ये नोंद नाही. यामुळे सरकारी कागदपत्र घेऊन कोणता स्कॅम होत आहे का? याची चौकशी करावी अशी मागणी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी मा. मुख्यमंत्र्यांना केली आहे.

कफ परेड, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, कुलाबा, मुंबई येथील झोपडपट्टी मध्ये स्थानिक कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची दिशाभूल केली जात असून चौकशी अंती फार मोठा स्कॅम आढळून येण्याची शक्यता आहे.

याठिकाणी संस्था एसआरए मध्ये नमूद असल्याचे सांगून रहिवासी यांच्याकडून त्यांची सर्व सरकारी दास्तायेवाज जमा केली जातं आहेत. सहाशे च्या वर लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टी मध्ये 4 ते 5 वेळेस नवं नवीन विकासक येऊन गेलेत त्या सर्व विकासकासोबत स्थानिक बोगस संस्थेने करार केला, एका विकासाकाने तर काही लाख लाख रु दिले, ती रक्कम गेली रहिवाशी्यांमध्ये न वाटता गेली कुठे (?) त्याबद्दलची माहिती व पत्रव्यवहार स्वयंघोषित कमिटी नागरिकांना द्यायला तयार नाही हे काय गौडबंगाल आहे.

झोपडपट्टी पुनर्विकास या साठी प्रचंड घोटाळा झाला असून आलेल्या सर्व विकासकांसोबत केलेले करार व त्यांच्याशी झालेला आर्थिक देणेघेण्याचा व्यवहार उघड झाल्यास असे समजून येईल की, या लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेतली आहे.

गमरे नावाची वकील असणारी व्यक्ती कायद्याचा धाक दाखवून प्रश्न विचारणाऱ्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवू असे सांगून धमकवतात तर तुम्ही अपात्र आहात व पात्र करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम घेऊन, सरकारी नियम धाब्यावर ठेवून स्वतःचा स्वार्थ साधला जातं आहे.

समजभूषण पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी सदर प्रकरणावर एक समिती स्थापन करून सत्यता तपासून पहात, पीडित लोकांना न्याय मिळावा व योग्य विकासाकांकडून यांचे पुनर्वसन करवून देण्यात यावे अशी मागणी केली असून विकासकाला अंधारात ठेवून अर्थकारण करणाऱ्या व स्थानिक  रहिवाशी्यांकडून दास्तऐवज व अपात्रतेची भीती दाखवून पात्रतेसाठी लुबाडणूक करून आशेवर ठेवून फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित सोसायटी चालक, जसे शिव शास्त्री नगर, मच्छिमार नगर 5, भगवान बॅनर्जी, एसआरए झोपडपट्टी अध्यक्ष रुके रामचंद्र, मोरे प्रकाश, द्वितीय कमिटी श्याम मांगेला रमण पावसे, साळवी, विजय व भास्कर तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री यांना केली आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...