शिवसेना (उ.बा.ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचातर्फे दीपावलीचे अवचित साधुन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कळमगाव येथील आदिवासी पाड्यात दिवाळी फराळ वाटप !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचातर्फे दीपावलीचे अवचित्त साधून बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त कानविंदे, पोस्ट कळमगाव, तालुका- शहापूर आदिवासी पाडा येथे तीन वाडी मधील २०० गोरगरीब जनतेसाठी दिवाळी फराळ, मीठाई, उटणे, दिवे, तेल, महिलांसाठी नविन साडी, लहान मुलांना नविन कपडे, खाऊ आणि नविन चप्पल आदी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी पाडा येथील प्रमुख पाहुणे श्री. लिलाघर भोईर (उपसरपंच), श्री.रमेश वेखंडे (माजी उपसरपंच), श्री.जगदिश वेखंडे (पोलिस पाटील), श्री.चंद्रकांत दगडू वेखंडे (ग्राम दक्षता अध्यक्ष) आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी पाडा गोरगरीब लोकाचे गोड तोंड करून दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या परिवाराचे संस्थापक अध्यक्ष -यशवंत खोपकर, संदीप चांदिवडे (खजिनदार), वसंत घडशी, दौलत बेल्हेकर, श्रीकांत चिंचपुरे, दीपक चौधरी, विनायक जाधव, प्रकाश कृष्ठे, विश्वास तेली, प्रकाश तोरणकर, यलप्पा कुशाळकर, बळीराम वरेकर, संजय चव्हाण, नीलू बंगेरा, प्रदीप गुप्त, अमरीश लोटललीकर, विनोद बिजेंकी, वैभव मानकामे, दिनेश कनिक, हरीष खोपकर, ईशांत खोपकर, अर्णव खोपकर, राजेश रावळ व अन्य शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने शिवसेना (उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या परिवाराचे संस्थापक अध्यक्ष -यशवंत खोपकर आणि अन्य पदाधिकारी, सदस्य, सभासद यांचे विभागात कौतुक होत असून त्यांना अनेकांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment