' ग्लोब ' म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी संधी उपलब्ध करून देणारी 'कमिटमेंट' कंपनी !!
*ग्लोब बॅंक्वेट हाॅलचे ना.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शानदार उद्घाटन*
डोंबिवली - सचिन बुटाला
बांधकाम व्यवसायात अल्पकाळात नावा रूपाला आलेली ग्लोब ही कंपनी म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी संधी उपलब्ध करून देणारी कमिटमेंट असल्याची प्रशंसा नामदार रवींद्र चव्हाण यांनी ग्लोब बँक्वेट हॉलचे उद्घाटन करताना केली. रविवारी सायंकाळी डोंबिवली एमआयडीसी फेज- १ येथे शानदार रीतीने ग्लोब बँक्वेट हॉलचे उद्घाटन नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक माधव सिंग तसेच त्यांचे इतर सहकारी संचालक त्यांचे चिरंजीव, कुटुंब आणि मोठ्या प्रमाणावर डोंबिवलीतील नागरिक या शानदार उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. ACP कुराडे व आमदार राजू पाटील यांनी सुद्धा येथे भेट देऊन बँक्वेट हॉल साठी ग्लोबला शुभेच्छा दिल्या. काही माजी नगरसेवक देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी ना.चव्हाण म्हणाले कि, ग्लोबच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या संधी उपलब्ध करून देण्यात ग्लोबचे महत्त्वाचे योगदान आहे.. ज्यावेळी एमआयडीसीतील कारखाने बंद होत होते त्यावेळी ग्लोबने वेगळ्या प्रकारचे औद्योगिक गाळे निर्माण केले. ज्यावेळी एका एकर मध्ये फक्त एक उद्योजक उद्योग करीत होता. त्यावेळी त्याच एका एकर मध्ये अनेक गाळे पायाभूत सुविधा सकट उपलब्ध करून असंख्य लघु उद्योजकांना संधी देण्याचा संकल्प ग्लोबने केला. ग्लोबला मिळणारे पहिले यश आणि यशाची पुनरावृत्ती होत असताना त्याचा चढता आलेखाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. हा देखणा बँक्वेट हॉल डोंबिवलीकरांसाठी तयार केला असून डोंबिवलीच्या वाढत्या लोकसंख्येच्या विचार करताना हा आता मध्यवर्ती ठिकाणी आहे. इथलं मंगलमय वातावरण इतकं आनंददायी आहे की, एका चांगल्या वातावरणामध्ये आपण समारंभ साजरा करत आहोत याचा आनंद नक्कीच डोंबिवलीकरांना होईल. डोंबिवलीकर आणि इतर ठिकाणी नागरिकांना सुविधा देत असताना ग्लोबची ग्राहकांना बांधकाम व्यावसायिक म्हणून दिलेली कमिटमेंट ही फार महत्त्वाची बाब आहे. डोंबिवलीकरांच्या वतीने या सुंदर वास्तूला शुभेच्छा देत असल्याचे नामदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ग्लोबचे संचालक माधव सिंग म्हणाले की डोंबिवली मध्ये अनेक बँक्वेट हॉल आहेत. परंतु तेथे पार्किंगची सोय नाहीये. या हॉलमध्ये आम्ही पार्किंगची मोठ्या प्रमाणावर सोय केली आहे. या बँक्वेट हॉलमध्ये दोन हॉल असून मोठ्या प्रमाणावर समारंभासाठी पाहुणे येणार असतील तर त्यासाठी मोठा हॉल आहे आणि छोट्या प्रमाणावर पाहुणे येणार असतील तर त्यासाठी एक छोटा अहवाल निर्माण केला आहे. बँक्वेट हॉलमध्ये सगळ्यात जास्त खर्च होतो तो जेवणावर आणि डेकोरेशन वर म्हणजे सजावटीवर .हा खर्च टाळण्यासाठी आम्ही इथे चांगल्या प्रकारचं सजावट केलेली असून अधिक सजावटीची गरज भासणार नाही. त्यामुळे बँक्वेट हॉल सुरू होताच येथे तीन महिन्याचं बुकिंग आम्हाला आगाऊ मिळालेलं आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य विनय भोळे यांनी सुंदर शब्दात केले.
No comments:
Post a Comment