Tuesday, 7 November 2023

कांचन नगरात निकृष्ट दर्जाचे गटारी मक्तेदाराची मनमानी –अधिकार्यांना हि जुमावत नाही दिवाळीत दुर्गंधी !!

कांचन नगरात निकृष्ट दर्जाचे गटारी मक्तेदाराची मनमानी –अधिकार्यांना हि जुमावत नाही दिवाळीत दुर्गंधी !!

जळगाव , प्रतिनिधी, दि.०७ :
जळगाव येथील कांचन नगरातील जागृत गुरुदत्त मंदिर गल्लीत गेल्या तीन महिने पासून फक्त ९५० स्के.फुट कॉंक्रेट गटारीचे काम सुरु आहे. 

सदरहू मक्तेदारांने सदरहू गटारीचे काम अत्यंत निकृष्टदर्जाचे केले आहे गटारीच्या तळाचा भाग भरलेला नाही. गटारीचे काम काही प्रमाणात बाकी असतांना येथिल नागरिक यांनी मक्तेदार यांना उत्कृष्ट दर्जाचे काम व गटारीचे तळ चांगले भरणे, गटारीच्या प्रवाहाची लेव्हल देणे संदर्भात सांगितले असता मक्तेदाराने काम थांबवले मला योग्य वाटेल ते काम करेल अन्यथा मी हे गटारीचे काम करणार नाही अशी मनमानी करणाऱ्या मक्तेदाराला शहर अभियंता चंद्रकांत सोनगीर व कनिष्ठ अभियंता जितेंद्र रंधे यांनी दुरध्वनी करून गटारीचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण कर अशा सुचना केल्या तरी सूद्धा मक्तेदार याने त्यांना हि जुमानले नाही व गटारीचे काम अपुर्ण तसेच पडू दिले. दिवाळी असतांना सूद्धा त्या परिसरात अत्यंत घाण पडलेली आहे. गटारीत डबके साचले आहेत. दुर्गंधी वातावरणात मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे तेथील नागरिकांनी सदरहू दिवाळी निरागसमय वातावरणात साजरी केली जाणार आहे. तेथील नागरिकांनी सदरहू गटारीचे नवीन व उत्कृष्ट काम करावे अशी मागणी चे निविदेन आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना दिले आहे.
         
 (राजेंद्र कोळी )
    विश्वासू                                    
जागृत गुरुदत्त मंदिर संस्था जळगाव                                                       मो.नं.९७६४२६५७२९.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...