Friday, 22 December 2023

दिव्यांग व्यक्तींनी पर्यावरणस्नेही वाहनावरील दुकानांसाठी 4 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत !!

दिव्यांग व्यक्तींनी पर्यावरणस्नेही वाहनावरील दुकानांसाठी 4 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत !!

             पनवेल, प्रतिनिधी :- व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ एस.आर.म्हैसकर यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे ही या योजनेची मुख्य उद्देश आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम मुदत 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...