Friday, 22 December 2023

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदती पासून अजून वाऱ्यावर !!

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदती पासून अजून वाऱ्यावर !!     

जव्हार, जितेंद्र मोरघा :

जव्हार तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायत मधील पवारपाडा येथे बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी भेट दिली असता तेथील परेश भाऊ ठोंबरे यांच्या मोडलेत्या घराच्या ठिकाणी जाऊन २ वर्षापूर्वी अवकाळी पावसामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले होते व पंचनामा ही केला होता हे एकनाथ दरोडा यांनी ते लक्षात आणून दिले व घराची पाहणी केली असता खूपच बिकट अवस्था झाली आहे.खर तर नुकसान झाल्यानंतर लवकरात लवकर नुकसान मिळाली पाहिजे परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे भरपाई वेळेवर मिळत नसल्याने गरीब कुटुंबावर अशी वेळ आली आहे.जव्हार तालुक्यातील अनेक घरांचे अवकाळी पाऊसामुळे नुकसान झाले असुन त्या  कुटुंबांना मदत अजूनही मिळाली नाही.

अवकाळी पाऊसामुळे परेश ठोंबरे या शेतकर्‍याच्या घराची पाहणी केली असता घर पुर्ण पणे मोडले असुन त्या शेतकर्‍यास लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी -(एकनाथ दरोडा -बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष)

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...