Saturday, 16 December 2023

गार्डीयन हायस्कूल भोपर, डोंबिवली या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न !!

गार्डीयन हायस्कूल भोपर, डोंबिवली या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           गार्डीयन हायस्कूल भोपर, डोंबिवली या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे आनंदाची पर्वणीच. यावर्षीचा गार्डीयन हायस्कूलचा स्नेहसंमेलनाचा विषय होता, ''AHAVAH ''..
            शाळेच्या भव्य पटांगणावर  स्नेहसंमेलन शाळेच्या मैदानावर पार पडले. दोन दिवसांच्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून आपले कलागुण व कौशल्य सर्वासमोर सादर केले. विदयार्थ्यांच्या बहारदार प्रस्तुतीकरणाने पाहुण्यांची मन जिंकली.
            यावेळी गार्डीयन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक स्वर्गीय. एम. टी. कोचूकुंजू सर यांना श्रध्दांजली वाहण्यात आल्री. विद्यार्थ्यांनी नृत्यांच्या माध्यमातून त्यांच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान यावर प्रकाश टाकला. दि. १४ डिसेंबर रोजी  शिशुगट आणि प्राथमिक विद्यालय श्रेणीतील या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय, फादर जोमोन थॉमस उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे पुष्य गुच्छ देऊन  स्वागत करण्यात आले. यावेळी स्वर्गीय. एम.टी. कोचूकुंजू सर यांच्या कुटुंबातील व्यक्‍ती तसेच वयाने लहान असलेल्या व्यक्तीबद्दल मनात असणारे प्रेम आणि मोठ्यांबद्दल असणारा आदरभाव व त्यांचा जीवनप्रवास यावर प्रकाश टाकला. दि. १५ डिसेंबर रोजी माध्यमिक विद्यालय श्रेणीतील पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सोसामा कोचूकुंजू उपस्थित होत्या.
             या कार्यक्रमाची सुरुवात 'स्वागत गीताने' झाली. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. १५ डिसेंबर रोजी स्वर्गीय एम.टी. कोचूकुंजू सर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य तसेच त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या अनेक सामाजिक संस्था व त्यांनी त्यासाठी केलेले कार्य यावर प्रकाश टाकला.सदर कार्यक्रमासाठी शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, पालक वर्ग, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...