Saturday, 23 December 2023

क्रिकेट सांघिक भावना जपणारा खेळ-प्रदिप वाघ !!

क्रिकेट सांघिक भावना जपणारा खेळ-प्रदिप वाघ !!

जव्हार,'जितेंद्र मोरघा :

काष्टी येथे कै. राघो बोटे स्मृती चषक अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की मुलांनी मैदानी खेळ खेळ पाहीजे व क्रिकेट सारखा खेळ एकट्याने चांगले खेळुन विजय मिळवता येत नाही, त्यासाठी सांघिक कामगिरी आवश्यक असते, म्हणून आपण सर्वांनी एक संघ रहा खेळा प्रमाणे गावच्या विकासासाठी एकत्र या असे हि ते यावेळी म्हणाले.

कै. राघो बोटे हे काष्टी गावातील थोर सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले त्यांच्या स्मरणार्थ हि स्पर्धा सरपंच गौरी रमेश बोटे व गावातील युवकांनी पुढाकार घेऊन आयोजित केली आहे.या उद्घाटन कार्यक्रमाला प्रदीप वाघ उपसभापती, रमेश बोटे उपाध्यक्ष आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती, चंदर बोटे, अंकुश बोटे, निलेश शिंदे, कल्पेश बोटे, लालासाहेब धायगुडे,  शिंदे, कामठी, भले, वांगड इत्यादी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील खेळाडु उपस्थित होते. रमेश बोटे यांनी सहकार्य करणाऱ्या गावकऱ्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...