Sunday, 4 February 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सायक्लोथॉनचे आयोजन !!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सायक्लोथॉनचे आयोजन !!

कल्याण, नारायण सुरोशी : राज्याचे लाडके आणि कर्तबगार लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‌शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे सायक्लोथॉन-२०२४  चे आयोजन करण्यात आले होते. या सायक्लोथॉन-२०२४ स्पर्धेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. 

येथील दुर्गाडी चौकातून या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून त्यामध्ये स्पर्धकांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. या स्पर्धेतील सहभागी सर्व सायकल स्पर्धकांना आयोजकांकडून टी-शर्ट, मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख श्री.रवी पाटील, उपशहर प्रमुख सुनील वायले, नितीन माने मा. नगरसेवक जयवंत भोईर, गणेश जाधव, गोरख जाधव, युवासेना विस्तारक सुचेत डामरे, विभाग प्रमुख राम तरे, नरेंद्र कामात रोहन कोट योगेश पाटील, स्वाती पाटील व आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...