Thursday, 14 March 2024

पत्रकार संजय कांबळे यांच्या आईच्या तल्लख बुध्दीमतेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, सत्तर वर्षापूर्वी शिकवलेले पाढे तोंडपाठ !

पत्रकार संजय कांबळे यांच्या आईच्या तल्लख बुध्दीमतेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, सत्तर वर्षापूर्वी शिकवलेले पाढे तोंडपाठ !

कल्याण, (प्रतिनिधी) : जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांच्या आई श्रीमती पवित्राबाई जयवंत कांबळे यांना इयता पहिली मध्ये सन १९५४ साली शिकवलेले पाडे आजही वयाच्या ८० व्या वर्षी तोंडपाठ असल्याने त्यांच्या या तल्लख बुध्दीमतेचा विडिओ सध्या सोशलमिडियावर तूफान व्हायरल होत आहे,
सध्या आपल्या शिक्षण पध्दतीचे धिंडवडे निघत आहेत, कुठे पेपर फुटला, पेपर लिक झाले, शिक्षक विद्यार्थीनी , विनयभंग, मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय,शिक्षणक्षेत्रातील राजकारण आदीमुळे या क्षैत्राचा खेळखंडोबा झाला आहे.
 

तर पूर्वीच्या काळात शिक्षण अंत्यंत चांगले, व खडतर परिश्रमानंतर मिळत होते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी कर्मचारी भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना 'कमवा व शिका, सावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हा मुलमंत्र दिला होता, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावचे पत्रकार संजय कांबळे यांच्या मातोश्री श्रीमती पवित्राबाई जयवंत कांबळे या सन १९५४ साली मौजे कालवडे, ता. कराड येथील जिल्हा परिषद शाळेत  दाखल झाल्या होत्या, त्यांचा विद्यार्थी रजिस्टर नंबर होता. २५९ बुक नं ३ तर शाळा सोडल्याची तारीख होती. १७/६/१९५५ या काळात त्यांना बाराखडी व पाढे शिकवले होते, ते आजही पवित्राबाई यांच्या तोंडपाठ आहेत. त्यांनी ते कँमे-यासमोर बोलून दाखविले, हा विडिओ सध्या सोशलमिडियावर (लिंक --  https://youtu.be/C6WqLX9Rk7w?si=iE9tVBQ8kNxlo9-z )  तूफान व्हायरल होत आहे.
आज त्यांचे वय ८० च्या वर आहेत, तरीही त्या रोज २/३ किलोमीटर अंतर चालून जातात, शिवाय घरातील, शेतातील सर्व काम करतात, त्यांची ही जिद्द १६/१७ वर्षाच्या तरुण- तरुणींना लाजवेल अशीच आहे.

काही वर्षांपूर्वी याच आजीने उंच घरावर चढून घराची पावसाळ्यापूर्वीची कामे करतानाचा विडिओ मोठ्या प्रमाणात सोशलमिडियावर व्हायरल झाला होता, आता तर बे चे पाढे बोलून दाखवून सर्वानाच चकित केले आहे. त्यांच्या या विडिओ मुळे पुर्वीच्या व आजच्या शिक्षण पद्धतीवर प्रश्न निर्माण केला आहे, आजीच्या या तल्लख बुध्दीमतेला आमचा दंडवत प्रणाम🙏🙏

लिंक - https://youtu.be/C6WqLX9Rk7w?si=iE9tVBQ8kNxlo9-z

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...