Wednesday, 13 March 2024

राज्य कार्यकारीणी बैठकीत येत्या २ एप्रिल रोजी राज्यभर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा जिल्हा परिषद वर आंदोलनाचा इशारा !!

राज्य कार्यकारीणी बैठकीत येत्या २ एप्रिल रोजी राज्यभर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा जिल्हा परिषद वर आंदोलनाचा इशारा !!

चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच बार्शी जिल्हा सोलापूर येथे पार पडली, सदर बैठकीचे अध्यक्ष म्हणुन महासंघाचे अध्यक्ष *कॉ.तानाजी ठोंबरे* हे होते तसेच सदर बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन *कॉ.डी.जी.तांदळे सर* यांनी महाराष्ट्रातील व देशातील सध्या राजकीय परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांची एकजूट संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले तसेच महासंघाचे सरचिटणीस कॉ.नामदेव चव्हाण यांनी  गेल्या  तीन महिन्याचा घरातील  विविध आंदोलनाची माहिती  व कामकाजाचा अहवाल  मांडला कार्याध्यक्ष कॉ.मिलिंद गणवीर उपस्थित होते. सदर बैठक क्रांती लॉज बार्शी येथे  झाली सदर बैठकी चा प्रास्ताविक व स्वागत कॉ. ए.बी. कुलकर्णी यांनी केले. 

मार्गदर्शक कॉ.डी.जी तांदळे सर यांनी संघटनेचे महत्त्व भविष्यात कामगार पुढे असणाऱ्या अडी अडचणी व त्यावरती मात करणेसाठी एकजूट व संघर्ष सुत्र अवलंबावे लागेल तसेच ***केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्या पासुन कामगारां वरती चालवलेला अन्याय करण्यासाठीदुर केंद्रातून व राज्यातून भाजप हटवले पाहिजे_ त्यासाठी कामगारांनां जागृत मतदार म्हणून भुमिका पार पाडावे लागेल असे प्रतिपादन केले. 

त्यानंतर सरचिटणीस कॉ‌. नामदेव चव्हाण यांनी अहवाल मांडला, त्यावरती १६ पदाधिकारी यांनी त्यावर चर्चा केली, चर्चैत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी १९ महिन्यांचा पगाराचा फरकाचा जीआर निघाला  परंतु किमान वेतनाची मुदत संपल्यानंतर २०१८ पासून च्या ५७ महिन्याच्या किमान वेतनाच्या फरकावर लढा देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले आणि सध्याचा जीआर नुसार फरक देणे आदी मागण्यांसाठी दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषद समोर स्थानिक प्रश्नांसाठी  आंदोलनं करण्याच्या इशारा देण्यात आला. तसेच प्रत्येक  तालुका व जिल्हा पातळीवर शिबीर घेण्याचे ठरले, याच निर्णयानुसार जळगाव येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या २६ मार्च रोजी मिळावा व २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्याचे ठरले. 

***सरकारने कबूल केलेले मागण्या परिपत्रके यावर निवडणूक आचारसंहिता काळात आंदोलन करणे कायदेशीर हक्क आहे असे या ठिकाणी ठासून सांगण्यात आले_

 ""आगामी राज्य अधिवेशनां"" बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व अधिवेश न जळगाव येथे देनेचे आहे असे ठरले. त्या चर्चे मध्ये सर्व जिल्यातील प्रतिनिधी आप आपली मते मांडली. सदर बैठकीला राज्यातील १० जिल्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये सर्व जिल्ह्यातील १६ पदाधिकारी यांनी सविस्तर चर्चा केली.. त्यामध्ये महासंघाचा प्रामुख्याने कामगार विरोधी भूमिका घेणाऱ्या भाजप सरकारला हटवणे, वार्षिक निधी जमा करणे, तसेच आयटक निधी सर्व  जिल्ह्यातील १६ पदाधिकारी यांनी सविस्तर चर्चा केली.. त्यामध्ये कॉम्रेड सखाराम दुर्गुडे, कॉ. अमृत महाजन, कॉ. मंगेश म्हात्रे, का. ए बी कुलकर्णी, राहुल जाधव, कॉ बबन पाटील, निळकंठ ढोके, किरण पांचाळ, उज्वल गांगुर्डे, सुधीर टोकेकर, सर्व जिल्ह्यातील 16 पदाधिकारी यांनी सविस्तर चर्चा केली..  यांचे सह राज्यातील कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातून राज्यसचिव कॉ. अमृत महाजन व जिल्हा सचिव कॉ. राजेंद्र खरे बैठकीला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...