"राष्ट्रीय कर्मचारी सेना" मा.आ.शिवसेना- सचिव अध्यक्ष श्री. किरण पावसकर यांच्या नेतृत्वात वरळी येथे गेट मीटिंग संपन्न !!
मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :
"राष्ट्रीय कर्मचारी सेना"मा.आ.शिवसेना-सचिव अध्यक्ष श्री.किरण पावसकर यांच्या नेतृत्वात दिनांक १२/०३/२०२४ रोजी एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड, सँडोज बँक हाऊस, शिवनगर इस्टेट, नेहरू तारांगण, पूनम चेंबरच्या बाजूला, वरळी - ४०० ०१८ येथे गेट मीटिंग घेण्यात आली. तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
कामगारांच्या न्याय हक्कासाठी एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड सीनियर प्रेसिडेंट राजेश शर्मा, व्हाईस प्रेसिडेंट हेमंत नाईक, सहाय्यक प्रेसिडेंट पंकज बोरसे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष सुमंत तारी, चिटणीस तातू नाईक, सचिन लिमण, महेंद्र जाधव, तुषार केसरकर, अंबादास गणेशकर, उपविभाग प्रमुख प्रदिप भंगारे, बेस्ट युनिट आणि जे.डब्ल्यू.मॅरियट हॉटेलचे प्रमुख पदाधिकारी तसेच एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड कामगार वर्ग व यूनियनचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment