Monday, 11 March 2024

पनवेल येथे जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने दुमदुमले

पनवेल येथे जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने दुमदुमले !!

*जाणता राजा महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद*

अलिबाग, प्रतिनिधी - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन रायगडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जाणता राजा या महानाट्याचे आयोजन 10 ते 12 मार्च दरम्यान पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी येथे करण्यात आले आहे. महानाट्याच्या प्रयोगाला पनवेलवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे. संपूर्ण परिसर शिवगर्जनेने दुमदुमला आहे.

या महानाट्य सोहळ्याचे उदघाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते महाआरती आणि शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य बघण्याचा योग या महानाट्याच्या माध्यमातून "याची देही याची डोळा "आला. महानाट्यातील कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण, उत्तम वेशभूषा, सुसंगत प्रकाश योजना व सजावट उपस्थित रसिकांकडून महानाट्याला मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषाने संपूर्ण परिसरातील वातावरण शिवमय झाले आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...