लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग आयोजित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !!
जव्हार-जितेंद्र मोरघा
मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील रसायनशास्त्र विभाग व आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नाशिक यांच्यामधील सामंजस्य करार अंतर्गत आज महाविद्यालयांमध्ये बी.एस्सी. विद्यार्थ्यांच्या करिता पदवीनंतर पॅथॉलॉजी विभागात वेगवेगळ्या संधी या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेच्या प्रास्ताविकात प्रा.एस.आर.व्हंडे यांनी या कार्यशाळेचा उद्देश व विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण केल्यानंतर पथोलॉजी विभागातील वेगवेगळ्या संधी व उपस्थित मान्यवर यांचा थोडक्यात परिचय करून दिला. या एकदिवसीय कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून, प्राध्यापिका योगिता पाटील विभाग प्रमुख आर.जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नाशिक यांनी विद्यार्थ्यांना प्रथम फार्मसीमधील सर्व प्रक्रिया समजून सांगितली तसेच महाराष्ट्र शासनामार्फत फार्मसी विभागात असलेल्या वेगवेगळ्या संधी, विषय कालावधी डिप्लोमा कोर्स मधील वेगवेगळे विषय समजून सांगितले व शासनामार्फत पात्र विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विभागात असणाऱ्या संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.डी.भोर साहेब यांनी सामंजस्य करार अंतर्गत घेतलेल्या एक दिवशीय कार्यशाळेचे कौतुक केले व हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना दिशा देणारा उपक्रम आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील समज, गैरसमज दूर होऊन योग्य निर्णय घेण्यास मदत होते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित म्हणून रसायनशास्त्र विभागातील प्रा.रमेश कवळे,प्रा. अरुण गावंडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.आर.व्हंडे यांनी केले तर प्रा.डॉ.विलास गाडे यानी उपस्थित मान्यवर व सर्व विद्यार्थी यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास विज्ञान विभागातील बी.एस्सी.द्वितीय वर्ष व बी.एस्सी.तृतीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
No comments:
Post a Comment