Thursday, 7 March 2024

योजनांचा लाभ घेऊन शेतकरी समृद्ध झाला पाहिजे - प्रदिप वाघ

योजनांचा लाभ घेऊन शेतकरी समृद्ध झाला पाहिजे - प्रदिप वाघ

जव्हार-जितेंद्र मोरघा

धामणेशत ग्रामपंचायत मधील पायरवाडी येथे पंचायत समिती मोखाडा कृषी व पशुसंवर्धन विभाग आयोजित शेतकरी मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना पंचायत समितीचे उपसभापती व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की राज्य शासन, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी व पशुपालकांनी घेऊन आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे तरच योजनांचा उद्देश सफल होईल असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात आदर्श शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात आले शिवाय त्यांचे अनुभव देखील त्यांनी कथन केले.शेती, फळबाग लागवड, फुलशेती, भाजीपाला, तसेच पशुपालन करणार्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगितले.शेतकर्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच विविध मार्गदर्शक पुस्तिके देखिल वाटप करण्यात आले, पशुसंवर्धन विभाग मार्फत विविध आजारांची माहिती,लक्षणे व उपचार पद्धती या विषयावर मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकानी केले, तसेच योजनांची माहिती देखील देण्यात आली.

या कार्यक्रमाला श्री प्रदीप वाघ उपसभापती, श्री कुलदीप जाधव गटविकास अधिकारी, अनिता पाटील पंचायत समिती सदस्य, सुरेश धिंडा सरपंच, वैशाली साळवे उपसरपंच, नवसु दिघा उपनगराध्यक्ष, नंदकुमार वाघ उपसरपंच, विलास गिरंधले, धामणशेत ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, सहायक गटविकास अधिकारी सुर्यवंशी, कृषी अधिकारी गोडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ भालचिम, डॉ.पोटे, डॉ भदाणे, पत्रकार रविंद्र साळवे तालुक्यातील आदर्श शेतकरी, महिला , ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...