Thursday, 7 March 2024

सरपंच कल्पेश राऊत यांच्या प्रयत्नातुन भांगरेपाडा येथे नदीवर लोखंडी पुलाच्या काम पुर्ण !!

सरपंच कल्पेश राऊत यांच्या प्रयत्नातुन भांगरेपाडा येथे नदीवर लोखंडी पुलाच्या काम पुर्ण !!

जव्हार - जितेंद्र मोरघा

कासटवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री.कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत हद्दीत नावीन्यपूर्ण अशी कामे चालू आहेत. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणून भांगरेपाडा येथे नदीवर लोखंडी पुलाच्या काम पूर्ण करण्यात झाले आहे. गेली 50 वर्षापासून रखडलेले काम आज ग्रामपंचायत पेसा निधीतून निधी उपलब्ध करून आज हे काम पूर्ण करण्यात आले. पावसाळ्यात याठिकाणी पाऊस पडला की शेतीकडे जाण्यासाठी व दुसऱ्या बाजूने 10 घरांची वस्ती आहे त्या ग्रामस्थांना येजा करण्यासाठी नदीच्या पाण्यातून जावं लागत होत, कधीकाळी तर पाऊस जास्त असल्यामुळे नदी ओलांडताना तासनतास वाटबघावी लागत होती. एक दोन वेळेस तर नदी ओलांडत असताना महिला व गुरे वाहून गेली होती. अशा अनेक गोष्टींचा सामना ग्रामस्थांना करावा लागत होता. परंतु हे सगळ कासटवाडी ग्रामपंचायतीचे  लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांना समजताच त्यांनी तिथे पुढे कुठलीही दुर्घटना घडू नये व ग्रामस्थांना, विद्यार्थांना, शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी लगेच निधी उपलब्ध करून दिला व काम सुद्धा पूर्ण केले. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विनायक राऊत, लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत, उपसरपंच.त्रिंबक रावते, ग्राम विकास अधिकारी किशोर सोनवणे, ग्राम.सदस्य- शंकर इल्हात, कुणाल सापटा, नितीन चौधरी, अशोक इंधन, नितीन टोकरे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...