बहुजन विकास आघाडीच्या महिला अध्यक्षपदी सुनंदा घाटाळ तर कार्य अध्यक्षपदी वंदना ठोंबरे यांची निवड !!
जव्हार - जितेंद्र मोरघा
बहुजन विकास आघाडीच्या जन संपर्क कार्यालय येथे बैठक लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब व राजेश पाटील साहेब बोईसर आमदार यांच्या आदेशाने व माजी खासदार बळीराम जाधव साहेब काशिनाथ पाटील साहेब, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जी पाटील साहेब, साहेब,ज्येष्ठ नेते विल्सन दादा यांच्या मार्गदर्शनखाली व जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत महिला कार्यकारणी निवड करणे या विषयावर चर्चा झाली असता सर्वांनी बिनविरोध एकमुखाने सुनंदा घाटाळ यांचे अध्यक्ष पदी तर वंदना ठोंबरे यांची कार्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी सचिव पदी चांभार शेत सरपंच योगिता जाबर तर उप अध्यक्ष पदी कोगदा सरपंच मथुरा भसरा, भारती वाजे,मीनाक्षी मौ ले एकमुखाने निवड तर गण प्रमुख यांची सुद्धा निवड करण्यात आली. यावेळी एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की, लवकरच सगळ्यांनी ग्रामपंचायत प्रमुख व बूथ प्रमुख निवडून पक्ष कार्यालयात लेखी स्वरूपात द्या म्हणजे लवकरात लवकर पद वाटपाचा कार्यक्रम करता येईल व पुढील लोकसभा निवडणुकी जवळ येत आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करा अशा सूचना देण्यात आल्या.यावेळी जव्हार तालुका सल्लागार वसंत दिघा,काशिनाथ दरोडा,सचिव रामचंद्र मौले, कार्य अध्यक्ष हेमंत घेगड, उप अध्यक्ष अनंता धनगरे, संजय सांबर, सुनील वळवी, दिलीप वाघ, निलेश घेगड, गणपत भेसकर, मयूर खरपडे, सूरज गांगड, वशिम भाई, सुनील दखणे, पांडू दखणे, जयराम भोरे व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment