उत्कर्ष विद्यालयात निवडणूक जनजागृती कार्यक्रम !!
वसई, प्रतिनिधी : शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व शाळा, महाविद्यालयात निवडणूक जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक जनजागृती कार्यक्रम दिनांक ९ मार्च रोजी पार पडला. मराठी माध्यम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.भक्ती वर्तक मॅडम आणि इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अंजू मिश्रा मॅडम यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे समन्वयक श्री नारायण कुट्टी सर व वसई विरार शहर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी प्रा. योगेश चौधरी सर उपस्थित होते. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी निवडणूक जनजागृती फेरी काढली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. यात काही नागरिक सुद्धा सहभागी झाले होते.
त्यानंतर प्राथमिक मराठी माध्यमाचे शिक्षक श्री किरण राणे सर यांनी लिहिलेले 'जागर निवडणुकीचा' हे पथनाट्य मुलांनी सादर केले. इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी देखील जनजागृतीपर पथनाट्य सादर केले त्यांना श्रीमती. ममता नाईक मॅडम यांनी मार्गदर्शन केले. श्री.महेश पाटील सर व शिक्षकेतर कर्मचारी श्री. शंभू नैय्या यांनी बनवलेल्या निवडणूक साहित्याची ओळख व निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती मुलांना श्री महेश पाटील सर यांनी सांगितली. तसेच प्रत्यक्ष मतदान पद्धती प्रात्यक्षिक मुलांना दाखविण्यात आले श्रीमती. अदिती भोईर मॅडम यांनी मतदान जनजागृती गीत सादर केले. श्रीमती. श्रद्धा ठाकूर मॅडम यांनी मतदान शपथ सांगितली. त्यांच्यासोबत सर्व शिक्षकांनी शपथ घेतली. श्रीमती. वंदना चित्रे मॅडम यांनी मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे संस्था, शाळा, मुख्याध्यापिका यांच्या वतीने आभार मानले.
No comments:
Post a Comment