उत्कर्ष विद्यालयात पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा !!
वसई, प्रतिनिधी : विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट उत्कर्ष विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन हा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. भक्ती वर्तक मॅडम या कार्यक्रमासाठी कर्तृत्ववान, मेहनती, कष्टाळू अशा स्त्रियांचा आदर सत्कार व सन्मान करतात. यावर्षी वसई बीआरसीच्या विषयतज्ञ सन्माननीय श्रीमती. सुजाता म्हात्रे मॅडम या विशेष अतिथी म्हणून लाभल्या होत्या. त्यांच्यासोबतच उत्कर्ष माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मनीषा चौबळ मॅडम सुद्धा उपस्थित होत्या. या विशेष अतिथी यांचा भारतीय संस्कृतीनुसार शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.
'सर्वांनी मिळालेल्या संधीच सोन केलं पाहिजे. संधी ही नवीन आव्हाने घेऊन येते, असे श्रीमती. सुजाता म्हात्रे मॅडम म्हणाल्या. तर 'आमची शाळा ही जणू काही आमचं माहेरच आहे आणि इथे आमच्यावर माया, प्रेम करणारे विद्यार्थी आमच्यासोबत असतात. त्यांना घडविण्याचे पवित्र कार्य करत असतो ' असे श्रीमती. मनीषा चौबळ मॅडम म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक श्रीमती. अपर्णा पालव मॅडम यांनी तर स्वागतगीत व ईशस्तवन श्रीमती. संजना रावराणे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाविषयी माहिती श्रीमती. मुग्धा पाटील यांनी तर आभार श्रीमती. लौकिता मॅडम यांनी केले. कलाविभाग प्रमुख श्रीमती. वंदना चित्रे मॅडम यांनी सुंदर गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. श्री. महेश पाटील सरांनी गोड खाऊ देऊन सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेछा दिल्या. श्री. किरण राणे सर यांनी सुंदर फलकलेखन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय श्रीमती. भक्ती वर्तक मॅडम यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment