कल्याण पश्चिमेत विविध विकासकामांचे भूमीपूजन, नागरिकांना उपलब्ध होणार मूलभूत आणि पायाभूत सुविधा !!
कल्याण, सचिन बुटाला : नुकतेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये कोणत्या न कोणत्या विकासकामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मा. नगरसेवक जयवंत भोईर यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले.
मी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मतदारसंघाच्या विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मोठया प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे. याच निधीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात विकासकामांना वेग आला आहे.
कल्याण पश्चिमेत होणार ही विकासकामे!
आमदार निधीतून उपलब्ध करून दिलेल्या कोट्यवधींच्या निधीतून प्रभाग क्रमांक. ३० मध्ये गटार आणि सिमेंटचा रस्ता, प्रभाग क्रमांक.१७ मध्ये बंदिस्त गटार बांधणे, टिटवाळा येथील प्रभाग क्रमांक ८,९,१० मध्ये ज्येष्ठ नागरिक कट्टा, वाचनालय, गटारे, पायवाटा तयार करणे, रस्ता काँक्रीटीकरण करणे, बल्याणी येथील प्रभाग क्रमांक. ११ मध्ये गटारे - पायवाट तयार करणे, उंभार्णी तलावाला संरक्षक भिंत बांधणे, उंभार्णी बौद्धवाडा येथे गटारे - पायवाटा तयार करणे, बल्याणी तलावातील गाळ काढून सुशोभीकरण करणे, प्रभाग क्रमांक. १ सापाड गाव येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक. ५ गौरीपाडा, टावरीपाडा रस्त्यांचे डांबरीकरण करणे अशा विविध विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. ज्यातून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
याप्रसंगी महिला जिल्हा संघटक सौ.छायाताई वाघमारे, विधानसभा संघटक मयूर पाटील, मा.नगरसेवक श्रेयस समेळ, उपशहर प्रमुख विजय देशेकर, विभाग प्रमुख अंकुश केणे, शाखाप्रमुख संतोष घोलप, रोहन कोट, अशोक भोईर, महेश पाटील, अशोक चौरे, कृष्णा सेल्वराज, सिकंदर मढवी, बंटी कुलकर्णी, जतिन प्रजापती, हरिचंद्र म्हात्रे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment