Monday, 11 March 2024

आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या मतदारसंघात विकासकामांचा धूमधडाका सुरुच !!

आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या मतदारसंघात विकासकामांचा धूमधडाका सुरुच !!

कल्याण, सचिन बुटाला, दि. ११ : कल्याण पुर्वेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेला राज्य शासनाचा विशेष विकास निधीतून आज आणखी विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या पत्नी सौ. सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदारांच्या मतदार संघातील उल्हासनगर शहरातील वसार गावातील वसार जिल्हा परिषद शाळा नुतनीकरण करणे, माणेरे वसार येथील गायकर नगर परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण, सी. सी. रस्ता व आर.सी.सी. गटार, सागर फुलोरे ऑफिस समोरील रस्ता कॉंक्रिटीकरण, द्वारली गावातील अभ्युदय शाळेला संरक्षण भिंत बांधणे तसेच नवीन शौचालय बांधणे, संतोष नगर (प्रभाग १५), जुनी पाण्याची टाकी या ठिकाणी बगिचा (गार्डन) बांधणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

विकासकामांच्या भूमिपूजन वेळी लहु वायले, अशोक वायले, अभिमन्यू चिकणकर, मुरलीधर राणे (सर), निलेश बोबडे इत्यादी मान्यवर, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, स्थानिक रहिवासी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरण मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत !!

उरण मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत !! ** ३४ उमेदवारांची माघार, ३९ उमेदवार रिंगणात. ** ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला फैसला;...