डॉ. बीएमएन कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त)चा चौथा पदवी प्रदान समारंभ विसनजी रावजी सभागृह (माटुंगा पूर्व) येथे संपन्न !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
डॉ.बीएमएन कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त)चा चौथा पदवी प्रदान समारंभ ९ मार्च २०२४ रोजी विसनजी रावजी सभागृह (माटुंगा पूर्व) येथे झाला.२०२२-२३ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठाकडून त्यांची पदवी प्रमाणपत्रे प्रमुख अतिथी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रो.रुबी ओझा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
श्रीमती मंजुलाबेन गुणवंतराय शाह पदव्युत्तर अभ्यास विभागाच्या कु. मेरीन मरियम आणि कु. अबुजी तनीम, कमलाबेन गंभीरचंद शहा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विभागाची कु. जयश्री चिचघरे आणि डॉ. बीएमएन कॉलेज ऑफ होम सायन्सच्या कु. धनानी हबीबुन्निशा यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.२५२ पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. २०२३-२४ या वर्षातील कु. सायली ललित, कु. पलख कोयलकर, कु. कायनात सिद्दीकी आणि कु. डॉली जैन यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीचा पुरस्कार देण्यात आला.तसेच गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment