Saturday, 9 March 2024

घुटकेश्वर महादेव मंदिर वाकडपाडा येथे शिवभक्तांची अलोट गर्दी !!

घुटकेश्वर महादेव मंदिर वाकडपाडा येथे शिवभक्तांची अलोट गर्दी !!

जव्हार, जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यातील प्राचिन शिवमंदिर श्री क्षेत्र घुटकेश्वर वाकडपाडा येथे पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी दर्शन घेतले.
2007 साली मंदीराचा जिर्णोध्दार झाल्या नंतर शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत अनेक विकासकामा मुळे मंदिर परिसर विकसित झाला आहे, हे मंदिर नैसर्गाच्या कुशीत वसलेले असल्याने अतिशय नयनरम्य दृश्य पहावयास मिळते.
आज महाशिवरात्र निमित्ताने सकाळ पासून च विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, भव्य शोभायात्रा, दिंडी,भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सर्व भाविकांना प्रसाद व फराळाचे वाटप करण्यात आले.
सर्व भाविकांचे मंदिर समितीचे अध्यक्ष  प्रदीप वाघ यांनी स्वागत केले व देणगीदार व सहकार्य करणाऱ्या दानशूर मान्यवरांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...