महादु बरफ यांचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम आयोजित !!
जव्हार, जितेंद्र मोरघा :
जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोराळे या शाळेतील जेष्ठ शिक्षक महादू तुळाजी बरफ यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंडाचापाडा येथे मुख्याध्यापक पदी नियुक्त झाल्याने, त्यांचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम आयोजिय करण्यात आला.
सदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी बोराळे गावचे उपसरपंच कुशन चिभडे यांनी पुढाकार घेऊन केंद्रातील जेष्ठ शिक्षक धुम यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रम यशस्वी पार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचाल रवी बुधर यांनी केले.बरफ हे अगदी शांत, संयमी स्वभावाचे असून त्यांच्या समोर एखादा शिक्षक अडचणीत असेल तर अगदी एखादा मिस्किल विनोद घडवून आणून त्या शिक्षकाचे टेन्शन घालवण्यासाठी माहीर समजले जातात, अशा या बरफ सरांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी उपसरपंच यांनी केंद्रातील जेष्ठ शिक्षक हातेरीचे धुम, जामसर केंद्राचे केंद्रप्रमुख सखाराम पवार, जामसर शाळेचे पदवीधर शिक्षक घेगड, गोरठण केंद्राचे केंद्रप्रमुख सहारे, बेहेडपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख खिरारी, खंडीपाडा शाळेचे मुकेश भोये, सारसून शाळेचे पदवीधर शिक्षक बाळू राथड व चौक शाळेचे पदवीधर शिक्षक कविवर्य बुधर सर यांना आमंत्रीत केले होते.या सर्व केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, सहशिक्षक यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम प्रसंगी बोराळे गावचे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापण समिती सदस्य, बचत गट महिला व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम पार पाडतांना शाळेतील शिक्षक संतोष गवळी सर, सुरेश भोरे सर, व शेलार मॅडम यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल उपसरपंच कुशनजी चिभडे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.शेवटी श्री पवार सर केंद्रप्रमुख जामसर यांनी सगळ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
No comments:
Post a Comment