Monday, 11 March 2024

ठाणे जिल्हा परिषदेचे आठ तर पंचायत समितीचे आठ कर्मचाऱ्यांना 'आदर्श कर्मचारी पुरस्कार !

ठाणे जिल्हा परिषदेचे आठ तर पंचायत समितीचे आठ कर्मचाऱ्यांना 'आदर्श कर्मचारी पुरस्कार ! 

*** नियोजन भवन मध्ये वितरण सोहळा

कल्याण (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्या परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे संवर्गात कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ठाणे जिल्ह्या परिषदेच्या विविध विभागांतील ८ तर पंचायत समितीच्या ८ कर्मचा-याची आदर्श कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली असून त्यांचा सन्मान जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते नियोजन भवन करण्यात आला.

ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत हजारो कर्मचारी व अधिकारी काम करत असतात, शासनाच्या विविध योजना, उपक्रम, अभियान, कार्यक्रम राबविण्यात यांचे मोलाचे योगदान असते.त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा प्रशासनातील कामात त्यांचे प्रोत्साहन वाढावे यासाठी सामान्य प्रशासन विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने वर्ग ३ व ४ संवर्गातील जिल्हा स्तरावरील ८ आणि पंचायत समिती स्तरावरील ८ अशा एकूण १६ कर्मचा-यांची आदर्श कर्मचारी म्हणून पुरस्कारासाठी निवड केली आहे. ही निवड ८ सदस्यीय समिती गठीत करून या कर्मचाऱ्यांचे गोपीनाथ अभिलेख विचारात घेऊन विहित निकषांनुसार व गुणांककणानुसार निवड केली आहे.

यामध्ये ठाणे जिल्हा स्तरावरील सहायक प्रशासन अधिकारी, मनोज शेजाळ, पाणी पुरवठा विभाग, विस्तार अधिकारी, विकास वेंखडे, महिला बालकल्याण विभाग, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, श्री घोडके, कनिष्ठ सहाय्यक, प्रशांत धनगर, शिक्षण विभाग, श्रावण भोये, वाहनचालक, अनिल शिंदे, आरोग्य विभाग, हवालदार/परिचर, शिल्पा नाईक, यशवंत  सांळुखे, अर्थ विभाग, तर पंचायत समितीचे अजय भोंडिवले, पण  पंचायत समिती शहापूर, श्रीमती सुरेखा पाटील, विकास मेनकर, अरुण विशे, नरेंद्र विशे, अरुण माळवदे आणि कल्याण पंचायत समितीचे किरण अधिकारी व राहुल अनंता कांबळे यांचा समावेश असून या सर्वांनी सहपत्नीक जिल्हा नियोजन भवन येथे उपस्थित राहून हा पुरस्कार स्विकारावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले आहे, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप असून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तो संपन्न होत आहे. याकरिता जिल्हा परिषदेचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...