Monday, 11 March 2024

स्वराज्य कोकण कलामंच मुंबई यांचे १६ मार्च २०२४ रोजी साहित्य मंदिर नाट्यगृहात नमनाचे आयोजन !!

स्वराज्य कोकण कलामंच मुंबई यांचे १६ मार्च २०२४ रोजी साहित्य मंदिर नाट्यगृहात नमनाचे आयोजन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             कोकणातील लोककलेचा दागिना  जोपासण्याचे काम कोकणातील अनेक नामवंत मंडळे, कलामंच, कोणताही खंड न पाडता सातत्याने करत आहेत अश्या नमन मंडळांना कलामंचाना कलाकारांना, नृत्यांगनाना, शाहिरांना, संगीतकारांना, साहित्यिकांना, लेखक, दिग्दर्शक, गीतकार यांना स्वराज्य कोकण कलामंच मुंबईचा मानाचा मुजरा, कोकणच्या लोककलेच्या प्रवाहात  वाहणारा. नांदी नव्या पर्वाची या ब्रीद वाक्याने कलाक्षेत्रात पर्दापण करणारा  स्वराज्य कोकण कलामंच मुंबई प्रस्तुत स्त्री पात्राने नटलेली कोकणची वैभवशाली लोककला नमन घेऊन येत आपल्या भेटीला  श्री गणेशाची भक्तीमय आराधना पारंपरिक बाज असणारी नटखट, शृंगारिक गौळण, मावशीबाईचा दिमाखदार प्रवेश, पेंदया, सुदाम आणि बोबडया यांचा विनोदी तडका आणि राधाकृष्ण यांची रासलीला तसेच संगीत सुस्वरांनी मन प्रसन्न करणारी सुप्रसिद्ध शाहीर प्रकाश पांजणे यांची गीतरचना आणि पार्श्वगायन खास आकर्षण शाहीर संदेश ओकटे ह्यांचे व ढोलकी, मृदुंग वादन, बेंजो मास्टर कु.अमोल नानिस्कर यांचे संगीत, स्वप्नील गुरव यांचे आटोपँड, आणि सौ.मयुरी दणदणे-कांबळे यांचे पार्श्वगायन श्री शाहीर रवींद्र नाचरे बुवा यांची अनमोल साथ आणि त्याला साजेसे कु.चेतन मोहिते आणि कु.सोनाली शिंदे ह्यांचे नृत्यदिग्दर्शन !

सोबतच छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एकनिष्ठ, बलाढ्य लढवय्याची शौर्यगाथा  सांगणारी नाट्यकलाकृती "बाजीप्रभू" एक अजिंक्य योद्धा..." चे सादरीकरण होणार आहे.

लेखक/संकल्पना राजेश गंगाराम येद्रे दिग्दर्शक - संदेश महादेव येद्रे, सहदिग्दर्शक संतोष ल येद्रे, निर्माते दिपक ल.हुमणे आणि कृष्णा दे.येद्रे. तर व्यवस्थापन म्हणून कु. प्रतीक गुडेकर, प्रशांत गुडेकर, सिद्धेश मोरे कलामंच प्रमुख नरेश दे.येद्रे, राजेश जोशी, दिलिप वेलुंडे, सुगंधा राऊत, शिरीष कदम, सूत्रधार प्रकाश मिसाळ, विकास येद्रे तर रंगभूषाकार रमाकांत घाणेकर तर स्वराज्य कोकण कलामंचाचे  आधारस्तंभ मा.श्री दिपकजी मांडवकर साहेब ह्यांच्या सहकार्याने हा शुभारंभ प्रयोग साहित्य मंदिर नाट्यगृह मुंबई रंगमंचावर शनिवार दिनांक १६ मार्च २०२४ रोजी रात्रौ ठिक ८:३० वाजता होणार असून असा हा नयन रम्य सोहळा पाहायला आपण मायबाप रसिक राजा नक्कीच या...! असे आवाहन स्वराज्य कोकण कलामंच मुंबई यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी किंवा तिकीटसाठी__ संदेश येद्रे- ९९२०९९७७३४/ सिद्धेश मोरे- ९९७५०२११६७ /प्रतीक गुडेकर ७७९८४९६२३२ यांच्याशी संपर्क साधवा.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...