लोक हिंद गौरव पुरस्कार- २०२४ साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचा वर्धापनदिन आणि ज्येष्ठ साहित्यिक कै. डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतीदिन या निमित्ताने लोक हिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्ग व जनक्रांती संस्था यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना 'लोक हिंद गौरव' हा पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येते.
यंदाचे या पुरस्काराचे ७ वे वर्ष असून ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. राज्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, उद्योग, आरोग्य, कामगार, प्रशासन, सहकार आणि आध्यात्मिक,समाज संस्था यांच्यासह विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. आलेल्या प्रस्तावातून राज्य निवड समिती छाननी करून ज्या शिफारस करतील त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात येतात. आकर्षक मानपत्र, आकर्षक सन्मानचिन्ह, श्री तुकाराम गाथा, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुकांनी त्यांचे प्रस्ताव २५ एप्रिल २०२४ पर्यंत महेश शिवाजी धानके 'संपादक, लोक हिंद चॅनेल, साई दत्त अपार्टमेंट, दुसरा मजला,ब्लॉक न. ५, यमुना नगर,संत तुकाराम बिल्डिंग समोर, चेरपोली, शहापूर, जिल्हा ठाणे, पिन ४२१६०१ या पत्यावर पोस्टाने, कुरियरने अथवा प्रत्यक्ष पाठवावे, असे आवाहन ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ व जनक्रांतीचे अध्यक्ष महेश धानके, उपाध्यक्ष लक्ष्मण घरत, तसेच उपसंपादक अंकुश भोईर,संतोष ठाकरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०४९०३७४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment