शिवसेनाचा बालेकिल्ला भक्कम !!
जव्हार-जितेंद्र मोरघा
मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत मधील वाघ्याचीवाडी व सावरपाडा येथील जेष्ठ कार्यकर्ते, युवक, महिला यांनी आज मोखाडा तालुका शिवसेना प्रमुख अमोल पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यामध्ये उबाठा गटातील ग्रामपंचायत सदस्य व इतर जेष्ठ पदाधिकारी यांचा समावेश आहे. सविता झुगरे ग्रामपंचायत सदस्य, केशव झुगरे ग्रामपंचायत सदस्य, नामदेव गिर्हे, जगन झुगरे, यशवंत झुगरे, देवराम रेरे, सखाराम झुगरे, काशिनाथ झुगरे, राहुल झुगरे, हिरामण झुगरे, संजय झुगरे, चिंतामण ढोले, देवीदास गिर्हे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रवेश केला. याप्रसंगी तालुका प्रमुख अमोल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले व कुठल्याही प्रकारची मदत लागली तर शिवसेना पक्ष आपल्या सोबत आहे, राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या कामगीरी मुळे, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख व शिवसेना नेते आमदार रवींद्र फाटक, उपनेते राजेश भाई शहा, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण व जिल्हा परिषद चे अध्यक्ष प्रकाश निकम, जेष्ठ नेते प्रल्हाद काका कदम यांच्या विश्वासावर अनेक पदाधिकारी शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत असेही अमोल पाटील यांनी सांगितले.यावेळी विधानसभा संघटक प्रदीप वाघ, विभाग प्रमुख निलेश झुगरे, उपतालुकाप्रमुख विष्णू हमरे, उपनगराध्यक्ष नवसु दिघा,संजय वाघ, मंगेश दाते, नंदकुमार वाघ, दशरथ पाटील, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment