Sunday, 2 June 2024

नालेसफाई नीट झाली नाही तर संबधित के.डी.एम.सी. अधिकारी - कंत्राटदारांची गय करणार नाही - आमदार विश्वनाथ भोईर

नालेसफाई नीट झाली नाही तर संबधित के.डी.एम.सी. अधिकारी - कंत्राटदारांची गय करणार नाही - आमदार विश्वनाथ भोईर 

कल्याण, सचिन बुटाला : पावसाळा सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील काही जागरूक नागरिकांनी नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याबाबत कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कडे तक्रार केली,. त्याआधारे आज कल्याण पश्चिमेतील काही प्रमुख मोठ्या नाल्यांची पाहणी आमदारांनी केली. यावेळी नाल्यांची सफाई अजिबातच व्यवस्थितरित्या झाली नसल्याचे आढळून आले. त्यावर के.डी.एम.सी. अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत, व्यवस्थित काम करत नसलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची सूचना केली. 

दरवर्षी आपण नालेसफाईवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करतो. हा सर्व पैसा जनतेच्या करातून गोळा झाला आहे. त्याची अशा प्रकारे उधळपट्टी होऊ देणार नाही, असे सांगत पुढील ५ दिवसांत कल्याण पश्चिमेतील सर्व प्रमुख नाल्यांची व्यवस्थित सफाई करावी. आम्ही पाच दिवसांनी पुन्हा एकदा त्यांची पाहणी करू आणि त्यामध्ये ज्या नाल्यांची व्यवस्थित सफाई झालेली नसेल त्याला जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदाराची आपण अजिबात गय करणार नाही, असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...